शशांक केतकर बिझी डबिगमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 11:56 IST2016-04-14T18:56:47+5:302016-04-14T11:56:47+5:30
काहीहा श्रीने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला सर्वाचा लाडका श्री म्हणजेच शशांक केतकर याची होणार सून मी हया घरची ही मालिका ...
.jpg)
शशांक केतकर बिझी डबिगमध्ये
क हीहा श्रीने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला सर्वाचा लाडका श्री म्हणजेच शशांक केतकर याची होणार सून मी हया घरची ही मालिका नुकतीच संपली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली असेल की, सध्या शंशाक काय करत असेल,पुन्हा कोणत्या मालिका या चित्रपटातून झळकणार याची वाट देखील प्रेक्षक लावून बसले असतील. तर शशांकच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे की, तो लवकरच वन वे तिकीट या चित्रपटातून झळकणार आहे. आणि सध्या तो याच चित्रपटाच्या डबिगमध्ये बिझी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे थोडी वाट तर पाहावीच लागणार मित्रांनो. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अमृता खानविलकर, सचित पाटील, गश्मीर महाजनी या तगडया कलाकारांचा समावेश आहे. मराठी इंडस्ट्रीत पहिल्यांदा क्रूझवर चित्रित करण्यात आलेला हा चित्रपट आहे. त्यामुळे साहजिकच या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे.
![]()