शशांक केतकर प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय आबंट-गोड 'मुरांबा'; जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 13:25 IST2022-01-20T13:24:45+5:302022-01-20T13:25:24+5:30
अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) एका नव्या भूमिकेत भेटीला येतो आहे.

शशांक केतकर प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय आबंट-गोड 'मुरांबा'; जाणून घ्या याबद्दल
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) ने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. शशांक होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून घराघरात पोहचला आहे. शेवटचा तो पाहिले न मी तुला या मालिकेत झळकला आहे. त्यानंतर आता तो नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे नाव आहे मुरांबा (Muramba Serial).या मालिकेचा प्रोमोदेखील रिलीज करण्यात आला आहे.
शशांक केतकरस्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा या मालिकेत नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून दुपारी १.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने मुरांबा मालिकेचा प्रोमो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
या प्रोमोत पाहायला मिळत आहे की, शशांक काहीतरी इव्हेंटचे काम करतो आहे आणि त्या गडबडीत त्याचा धक्का एका मुलीला लागतो. त्या मुलीच्या हातातील ताट खाली पडते. ती त्याच्यावर भडकते आणि बडबडते पण ती त्याला पाहताच क्षणी प्रेमात पडते. तिचे बडबडून झाल्यावर शशांक तिला बोलतो की काहीही काय बोलते. फालतूमध्ये इथे काम करणाऱ्या लोकांशी मला वाद घालायचा नाही. इतक्यात त्या मुलीची बेस्ट फ्रेंड येते ती म्हणते ये हिरो फालतू कोणाला बोलतोस?. माझ्या बेस्ट फ्रेंडला. तुझी हिंमत कशी झाली? त्या मुलीला पाहून तिच्या प्रेमात शशांक पडतो. त्यामुळे नक्की पुढे काय घडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.