शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस पुन्हा दिसणार एकत्र? अभिनेता म्हणतो, "४ वर्षांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 11:50 AM2024-04-14T11:50:28+5:302024-04-14T11:52:34+5:30

'हे मन बावरे' फेम मृणाल आणि शशांकची जोडी ४ वर्षांनी पुन्हा एकत्र आली आहे.

shashank ketkar and mrunal dusanis meet 4 years after he man bavre serial | शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस पुन्हा दिसणार एकत्र? अभिनेता म्हणतो, "४ वर्षांनी..."

शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस पुन्हा दिसणार एकत्र? अभिनेता म्हणतो, "४ वर्षांनी..."

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर घराघरात पोहोचला. पहिल्याच मालिकेने लोकप्रियता मिळवून दिल्यानंतर शशांक 'हे मन बावरे' मालिकेत दिसला होता. या मालिकेत त्याने अभिनेत्री मृणाल दुसानीसबरोबर स्क्रीन शेअर केली होती. 'हे मन बावरे'मधील शशांक आणि मृणालची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेत शशांकने सिद्धार्थ तर मृणाल अनूच्या भूमिकेत दिसली होती. आता ४ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. 

शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन मृणालबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "सिद्धार्थ अनूला भेटला! मृणाल दुसानीस वेलकम बॅक... हे मन बावरे ही मालिका संपून ४ वर्ष झाली पण, "अजूनही परत परत बघतो" अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते, आजही! मग मंडळी, ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का ?" असं कॅप्शन शशांकने या पोस्टला दिलं आहे. त्याच्या या पोस्टमुळे मृणाल आणि शशांक पुन्हा टीव्हीवर एकत्र काम करताना दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

'हे मन बावरे' मालिकेनंतर मृणाल मनोरंजन विश्वापासून दूर होती. लग्नानंतर ती पतीबरोबर अमेरिकेला स्थायिक झाली होती. त्यानंतर आई झाल्याने तिने कामातून काही वेळ ब्रेक घेतला होता. आता चार वर्षांनी मृणाल दुसानीस पुन्हा भारतात परतली आहे. लवकरच ती कमबॅक करणार असल्याच्याही चर्चा आहेत. मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'असं सासर सुरेख बाई', 'तू तिथे मी' या मालिकांमध्येही काम केलं आहे.  

Web Title: shashank ketkar and mrunal dusanis meet 4 years after he man bavre serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.