शरद केळकर दिसणार महाराजा रणजितसिंह या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 11:19 IST2017-03-02T05:49:28+5:302017-03-02T11:19:28+5:30

शरद केळकरने छोट्या पडद्यावरून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर तो चित्रपटांकडे वळला. त्याने हिंदी, मराठी आणि ...

Sharad Kelkar will appear in this series of Maharaja Ranjeet Singh | शरद केळकर दिसणार महाराजा रणजितसिंह या मालिकेत

शरद केळकर दिसणार महाराजा रणजितसिंह या मालिकेत

द केळकरने छोट्या पडद्यावरून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर तो चित्रपटांकडे वळला. त्याने हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तर त्याचा चांगलाच जम बसला आहे. तसेच तो अनेक चित्रपटांना, कार्टून्सन्स व्यक्तिरेखांना व्हॉइज ओव्हरदेखील देतो. तो सध्या चित्रपटांमध्ये व्यग्र असला तरी छोटा पडदा हे त्याचे पहिले प्रेम आहे. 
शरदने गेल्या वर्षभरात पाच चित्रपटांमध्ये काम केले होते तर आता तो संजय दत्तसोबत भूमी या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. पण या सगळ्यातून वेळ काढून तो आथा पुन्हा मालिकेकडे वळला आहे. 
महाराजा रणजितसिंह या मालिकेत तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकेच्या पहिल्याच भागात प्रेक्षकांना शरदला पाहायला मिळणार आहे. या भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांना शूर शीख समुदायाची आणि त्यांना आपल्या पंजाबच्या भूमीबद्दल असलेल्या प्रेम आणि अभिमानाची ओळख करून देणार आहे. या मालिकेतील भूमिकेविषयी शरद सांगतो, "सध्या मी चित्रपटांमध्ये व्यग्र असलो तरी मी या मालिकेत काम करणार आहे. खरे तर मला पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारायला आवडतच नाही. त्यामुळे मी या मालिकेत काम करायला सुरुवातीला नकार दिला होता. पण या मालिकेची कथा ऐकल्यानंतर मी माझा निर्णय बदलला. छोट्या पडद्यावर पहिल्यांचा शीख समाजावर मालिका बनवण्यात येत आहे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून शीख प्रेक्षकांना आदर राखण्यासाठी मी ही भूमिका स्वीकारण्याचे ठरवले. शीख समाजाला अभिमान वाटेल अशी या मालिकेची कथा आहे. बांदासिंह बहादूर ही शिख व्यक्तिरेखा या मालिकेत मी साकारत असून ही भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे." 

Web Title: Sharad Kelkar will appear in this series of Maharaja Ranjeet Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.