शरद केळकर १९ वर्षीय अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स, नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:41 IST2025-03-24T12:39:38+5:302025-03-24T12:41:19+5:30
शरद केळकर टीव्हीवर कमबॅक करत आहे.

शरद केळकर १९ वर्षीय अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स, नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का?
Sharad Kelkar: टीव्हीपासून बॉलिवूड आणि ओटीटीपर्यंत आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या शरद केळकरने खूप मेहनत घेतली आहे. आज अभिनयासोबतच डबिंगच्या जगातही तो एक प्रसिद्ध नाव आहे. त्याची मोठी फॅन फोलोविंग आहे. आता तो बऱ्याच वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. झी टीव्हीवर 'तुम से तुम तक' (Tum Se Tum Tak Serial,) मालिका लवकरच सुरु होणार आहे. यामध्ये शरद केळकर मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेचा प्रोमोही प्रदर्शित झाला आहे.
'तुम से तुम तक' मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की, सामान्य कुटुंबातील १९ वर्षीय 'अनु'साठी ( निहारिका चौकसी) तिची आई योग्य जोडीदार शोधतेय. तर, दुसरीकडे ४६ वर्षीय बिझनेसमन 'आर्य वर्धन'ला (शरद केळकर) त्याची आई लग्न करण्याचा सल्ला देते. पण, ४६ वर्षे वय झाल्याने तो लग्नास नकार देतो, असं प्रोमोत दिसतंय. या मालिकेत झळकणारी अभिनेत्री निहारिका चौकसी (Niharika Chouksey ) ही खऱ्या आयुष्यात १९ वर्षांची आहे. शरद हा ४८ वर्षांचा आहे. त्यामुळे चाहत्यांना दोघांमधील वयाचे अंतर पटलेलं नाहीये.
दरम्यान, शरद आणि निहारिकाची 'तुम से तुम तक' ही मालिका मराठीतील सुबोध भावे आणि गायत्री दातारची गाजलेली मालिका 'तुला पाहते रे' चा रिमेक असणार आहे. शरद केळकरच्या आधी या भूमिकेसाठी अभिनेता करण सिंह ग्रोवरचाही विचार झाला होता. त्याच्यासोबत हेली शाह झळकणार अशी चर्चा होती. पण, अखेर शरद केळकरच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. २००४ पासून शरद केळकर हिंदी मालिकांमध्ये झळकत आहे. २०१७ साली आलेल्या 'कोई लौट के आया है' मालिकेत तो शेवटचा दिसला होता. मालिकांशिवाय तो अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये दिसला आहे. अलिकडेच शरदचा 'रानटी' सिनेमा प्रदर्शित झाला होता.