शंतनु आणि निखिल डिझाईन करणार हर्ष राजपूतचे कपडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 14:14 IST2018-08-10T14:13:49+5:302018-08-10T14:14:35+5:30
‘नजर’ या मालिकेतील प्रत्येक व्यक्तितिरेखेची वेशभूषा ही स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण फॅशन असून त्या व्यक्तिरेखा आपला एक ट्रेंड निर्माण करीत आहे.

शंतनु आणि निखिल डिझाईन करणार हर्ष राजपूतचे कपडे
छोट्या पडद्यावरील काही मालिका आपली ग्लॅमरस वेशभूषा आणि नवी फॅशन यामुळे नवा ट्रेंड निर्माण करतात. अशा मालिकांचे कथानक तर विशेष उत्कंठावर्धक असतेच, पण त्यातील नवनवी फॅशन ही प्रेक्षकांना या मालिकेकडे आकर्षितही करते. अशीच एक मालिका आहे ‘स्टार प्लस’वरील ‘नजर’.
‘नजर’ या मालिकेतील प्रत्येक व्यक्तितिरेखेची वेशभूषा ही स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण फॅशन असून त्या व्यक्तिरेखा आपला एक ट्रेंड निर्माण करीत आहेत. यासंदर्भात मालिकेच्या निर्मात्यांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नसून त्यासाठी त्यांनी शंतनू आणि निखिल या देशातील आघाडीच्या फॅशन डिझायनर्सना करारबद्ध केले आहे. हे डिझायनर्स मालिकेचा नायक हर्ष राजपूतचे कपडे डिझाईन करणार आहेत.
निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “मालिकेचा नायक अंश राठोड (हर्ष राजपूत) हा लवकरच एक महापूजा करणार आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात हर्ष आजवरचा त्याचा सर्वात ग्लॅमरस पारंपरिक पोशाख परिधान करणार आहे. आजच्या घडीला फॅशनच्या क्षेत्रात ज्यांचे नाव सर्वतोमुखी आहे, ते शंतनू आणि निखिल बंधूचे. हे बंधू हा वेश डिझाईन करणार आहेत; कारण या प्रसंगासाठी आम्हाला अंशला अगदी उचित कपड्यांमध्ये सादर करायचे होते.” प्रेक्षकांना हर्ष एका भरजरी आणि वैशिष्ट्यपूर्ण पोशाखात दिसेल. हर्षचा हा नवा अवतार प्रेक्षकांना भावेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
नजर हे आधुनिक भारतातील एक सुपरनॅचरल फँटसी नाट्य असून आपल्या सभोवताली असलेल्या सुपरनॅचरलच्या काळ्या शक्तींबद्दल आणि त्याचा राठोड परिवारावर कसा परिणाम होतो याबद्दल बोलते. या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची (हडळीची) नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे