शंकर महादेवनने नीतीन नायकला दिले आपल्या म्युझिक अकॅडमीत दाखल होण्याचे आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 17:35 IST2017-02-18T12:05:23+5:302017-02-18T17:35:23+5:30

रायझिंग स्टार हा रियालिटी शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या शोसाठी  शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर ...

Shankar Mahadevan invited Nitin Nayak to join his Music Academy | शंकर महादेवनने नीतीन नायकला दिले आपल्या म्युझिक अकॅडमीत दाखल होण्याचे आमंत्रण

शंकर महादेवनने नीतीन नायकला दिले आपल्या म्युझिक अकॅडमीत दाखल होण्याचे आमंत्रण

यझिंग स्टार हा रियालिटी शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या शोसाठी  शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर या परीक्षकांचे पॅनेल स्पर्धकांना या प्रवासात पारखून घेत आहेत. शनिवारी रायझिंग स्टारच्या मंचावर अद्वितीय बुद्धिमत्तेची झलक सादर झाल्यानंतर, या शोमध्ये लहान मुलांच्या विशेष एपिसोडद्वारे रायझिंग स्टारच्या भव्य-दिव्य मंचावर देशातील लिटिल वंडर्सचं स्वागत करण्यात आल.
     
          रायझिंग स्टारच्या रविवारच्या एपिसोडमध्ये गायक बनून संगीत उद्योगात स्वत:ची छाप उमटवू पाहणाºया युवा स्पर्धकांनी कला सादर केली. गाण निवडण्यातील त्यांची हुशारी आणि कोवळया वयात श्रोत्यांच लक्ष वेधून घेण्याची क्षमता या संध्याकाळची मुख्य आकर्षण ठरली. या स्पर्धकांची प्रेरणा आणि धाडस पाहून परीक्षक इतके प्रभावित झाले की त्यांना शब्दच सुचले नाहीत. मथुराचा एक तरुण मुलगा, नीतीन नायक, यान कडी आ मिल सांवल यार सादर करताना आपल्या प्रभावी सुफियाना अंदाजान हा शो जिंकला. या लाईव शूटमध्ये त्याच्या गायकीन परीक्षक तर खुश झालेच पण, प्रेक्षकांनीही ताल धरला. त्याच्या कामगिरीला ९३ टक्के मत मिळून त्याला रायझिंग स्टार की दीवार हा या शोमधला एक महत्वाचा घटक प्राप्त झाला.
     
         पण इतकंच नव्हे! हा रायझिंग स्टार अनुभव नीतीनसाठी नशीबवान ठरला कारण त्याच्या गायकीन धुरंधर गायक शंकर महादेवन सर्वाधिक प्रभावित झाले. शंकर यांनी नीतीनला आपल्या म्युझिक अकॅडमीमध्ये एक खास सीट लगेच देऊ केली. त्याच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करताना, शंकर महादेवन म्हणाले, शंकर महादेव म्युझिक अकॅडमीमध्ये आम्ही ६७ हून अधिक देशांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत शिकवतो, आणि, तुझी इच्छा असेल तर, या अकॅडमीमध्ये नीतीन नायकसारखा विद्यार्थी असणे मला आवडेल.

Web Title: Shankar Mahadevan invited Nitin Nayak to join his Music Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.