​शंकर जयकिशन थ्री इन वन या मालिकेत केतन सिंग साकारणार तीन भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 12:50 IST2017-07-22T07:20:06+5:302017-07-22T12:50:06+5:30

शंकर जयकिशन थ्री इन वन ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेतील शंकर, जय आणि किशन अशी ...

In the Shankar Jaikishan Three In One series, Ketan Singh will play three roles | ​शंकर जयकिशन थ्री इन वन या मालिकेत केतन सिंग साकारणार तीन भूमिका

​शंकर जयकिशन थ्री इन वन या मालिकेत केतन सिंग साकारणार तीन भूमिका

कर जयकिशन थ्री इन वन ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेतील शंकर, जय आणि किशन अशी तीन आयुष्यं एकावेळी जगणाऱ्या किशनची कथा प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत या तिन्ही व्यक्तिरेखा केतन सिंग साकारणार आहे. केतन सिंगने याआधी सॉलिड पॅट्लस आणि जिगरिया यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या मालिकेत काम करण्यासाठी केतन सध्या चांगलाच उत्सुक आहे.
शंकर जयकिशन थ्री इन वन या मालिकेत केतन सिंग किशन ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. एका अपघातात शंकर, जय आणि किशन या तिळ्या मुलांपैकी किशन एकटाच वाचतो. त्याची आई ही विधवा असून ती अपंग आहे. तसेच तिचे हृदय अतिशय कमजोर आहे. त्याच्या आईला हार्ट अॅटॅक देखील येऊन गेला आहे. त्यामुळे तिच्या तीन मुलांपैकी दोन मुलांचे निधन झाले आहे ही गोष्ट ती सहन करू शकत नाही याची चांगलीच कल्पना किशनला आहे. त्यामुळे किशन आपल्या दोन भावांचा मृत्यू झाला आहे ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवण्याचे ठरवतो आणि आईसमोर जय आणि शंकर या भूमिकेतही वावरतो. 
एकाच मालिकेत तीन भूमिका साकारायला मिळत असल्याने केतन खूपच खूश आहे. कारण या तिघांमधील एक जण डॉक्टर, दुसरा पोलीस तर तिसरा रिअल इस्टेट एजंट आहे. या भूमिकेबदद्ल केतन सांगतो, एकाच मालिकेत तीन भूमिका साकारायला मिळाल्यामुळे मला एक खूप मोठी संधी मिळाली असल्याचे मला वाटत आहे. एक कलाकार म्हणून या मालिकेत मला अभिनय करायला खूप वाव मिळणार आहे. तसेच आपल्या आईच्या आनंदासाठी एक मुलगा काय काय करतो हे या मालिकेत पाहाणे लोकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. या मालिकेत मी सतत खोटे बोलत असून त्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे. 

Web Title: In the Shankar Jaikishan Three In One series, Ketan Singh will play three roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.