१२ वर्षांचा असतानाच शाल्व किंजवडेकरला मिळालं चॉकलेट बॉयचं नाव, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 14:42 IST2024-03-04T14:42:26+5:302024-03-04T14:42:56+5:30
Shalv Kinjwadekar : शाल्व किंजवडेकर सध्या झी मराठीच्या 'शिवा' या मालिकेमध्ये आशुतोषची भूमिका साकारत आहे.

१२ वर्षांचा असतानाच शाल्व किंजवडेकरला मिळालं चॉकलेट बॉयचं नाव, जाणून घ्या याबद्दल
आताच्या काही अभिनेत्यांनी खरंतर लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि आता कलाविश्वात आपला ठसा उमटवत आहेत. त्यातलाच एक अभिनेता असा आहे ज्याने आपल्या पहिल्या कामाच्या मानधनाची हुशारीने गुंतवणूक केली आणि आता तो अभिनेता मराठी मालिकांमधील लाडका अभिनेता बनला आहे त्याचं नाव आहे शाल्व किंजवडेकर.
शाल्व किंजवडेकर याने आपल्या पहिल्या कामाबाबत आणि पहिल्या मिळालेल्या मानधनाबाबत सांगितले. तो म्हणाला, "आयुष्यातलं पाहिलं काम वय वर्ष १२ होत तेव्हा मिळालं. मी एका थिएटर कंपनी सोबत काम करत होतो त्या कंपनीची एका चॉकलेटची जाहिरात होती त्यासाठी मी माझं नाव नोंदवलं आणि मला ती जाहिरात मिळाली. तर हे माझ्या आयुष्यातलं सर्वात पाहिलं काम होत. त्या जाहिरातीतून जे पैसे मिळाले होते तो माझा पहिला पगार होता आणि मी तो खर्च न करता त्याची गुंतवणूक केली होती." शाल्व सध्या झी मराठीच्या 'शिवा' या मालिकेमध्ये आशुतोषची भूमिका साकारत आहे. 'शिवा' सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त झी मराठीवर पाहायला मिळेल.
वर्कफ्रंट
झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता शाल्व किंजवडेकरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. हा अभिनेता पदार्पणातच प्रचंड लोकप्रिय झाला. त्याची या मालिकेतील ओम ही व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शाल्वने मालिकांबरोबरच चित्रपटातही काम केले आहे.