‘झलक दिखला जा’मध्ये दिसणार शक्ति अरोरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 17:36 IST2016-04-02T00:17:23+5:302016-04-01T17:36:46+5:30
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता शक्ति अरोरा ‘झलक दिखला जा’च्या नवव्या सिझनमध्ये थिरकताना दिसू शकतो. तूर्तास यासंदर्भातील प्रस्ताव शक्तिपुढे ठेवण्यात आला ...

‘झलक दिखला जा’मध्ये दिसणार शक्ति अरोरा?
स प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शक्ति अरोरा ‘झलक दिखला जा’च्या नवव्या सिझनमध्ये थिरकताना दिसू शकतो. तूर्तास यासंदर्भातील प्रस्ताव शक्तिपुढे ठेवण्यात आला असून त्यावर चर्चा सुरु आहे. ‘मेरी आशिकी तुम से ही’ या मालिकेत शक्तिने रणवीरची भूमिका साकारली आहे. आता तो ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोचा भाग बनण्याच्या तयारीत आहे. तूर्तास माझी यासंदर्भात निर्मात्यांशी चर्चा सुरु आहे. सध्या मी कुठल्याही करारावर स्वाक्षरी केलेली नाही. शो जुलैमध्ये सुरु होणार असल्याने माझ्या हाती निर्णय घेण्यास पुरेसा वेळ आहे. पण माझे मत विचाराल तर मी डान्स शो करण्यास उत्सूक आहे. मी चांगला डान्सर नाही. त्यामुळेच मला हा शो करण्यात रूची आहे, असे शक्तिने सांगितले. शक्ति सध्या ‘मन में है विश्वास’ या मालिकेच्या दुसºया सिझनला होस्ट करीत आहे. ‘पवित्र रिश्ता’मधून टीव्ही जगतात पदार्पण करणाºया शक्तिने स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘ज्ञान गुरु ’आणि ‘सायन्स विद ब्रेन कॅफे’हे शो त्याने याआधी होस्ट केलेले आहेत.