'शाहरुख खानचा 'पठाण'मधला लूक माझ्यासारखा, कारण…', अभिजीत बिचुकलेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 15:02 IST2022-12-28T15:01:31+5:302022-12-28T15:02:06+5:30
बिग बॉस फेम अभिनेता अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) पुन्हा चर्चेत आला आहे.

'शाहरुख खानचा 'पठाण'मधला लूक माझ्यासारखा, कारण…', अभिजीत बिचुकलेचा दावा
बिग बॉस फेम अभिनेता अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असतो. नुकतेच बिचुकलेने अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटातील लूकबाबत मोठा दावा केला आहे. तो म्हणाला की, शाहरुख खानचा पठाण चित्रपटातील लूक माझ्यासारखा आहे. कारण मी बिग बॉसमध्ये असताना शाहरुख खान बिगबॉस पाहत होता.
अभिजित बिचुकले म्हणाला, कोणीतरी ट्वीट केले आणि ती बातमी प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यात म्हटले आहे की शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो. ही एक सकारात्मक गोष्ट म्हटली पाहिजे. माझी बिग बॉसमधील हेअरस्टाईल होती. १९९१ मध्ये मी लहान होतो तेव्हा संजूबाबा म्हणजे संजय दत्तचे लांब केस होते. मात्र, आता २२ वर्षांनी जी स्टाईल आणली गेली ती माझी. मला वाटते शाहरूख खान बिग बॉस पाहत होता. सीझन १५ मध्ये मी काय करिष्मा केला, ‘मैंने क्या गुल खिलाए’ हे शाहरूखनेही पाहिले आहे. लोकांनीही ते पाहिले आहे. त्यामुळे ही लांब केसांची स्टाईल माझ्यामुळे ट्रेंडमध्ये आली असावी.
तो पुढे म्हणाला की, सलमान खान आणि मी एका इंडस्ट्रीत आहोत. सिनेइंडस्ट्री असेल किंवा राजकारण असेल इथं कोणी कोणाचा शत्रू असतो असे मला वाटत नाही. त्या त्यावेळी ते घडून गेलेले असते. राहिला विषय आज सलमान खानचा वाढदिवस आहे याचा, तर ते नेहमीप्रमाणे साजरा करत आहेत. त्या माणसाचेही माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे माणूस म्हणून त्याला माझ्या शुभेच्छा आहेतच.