​शाहरुख खान सांगतोय, ही अभिनेत्री दिसते साडीत अतिशय सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 14:52 IST2018-01-05T09:22:08+5:302018-01-05T14:52:08+5:30

शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडचा बादशहा अशी त्याची ओळख आहे. मोठ्या पडद्याप्रमाणे त्याने छोट्या ...

Shahrukh Khan is telling, the actress looks very cute in the sari | ​शाहरुख खान सांगतोय, ही अभिनेत्री दिसते साडीत अतिशय सुंदर

​शाहरुख खान सांगतोय, ही अभिनेत्री दिसते साडीत अतिशय सुंदर

हरुख खानने बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडचा बादशहा अशी त्याची ओळख आहे. मोठ्या पडद्याप्रमाणे त्याने छोट्या पडद्यावर देखील त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. सध्या तो ‘स्टार प्लस’वरील ‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’ या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे. या कार्यक्रमातील त्याचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.  व्हँकुव्हर येथे टेड टॉक्स कार्यक्रमात केलेल्या प्रेरणादायी भाषणानंतर त्याने तेथील प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण त्या कार्यक्रमानंतर शाहरूखला टेड टॉक्स कार्यक्रमाच्या संकल्पनेबद्दल विशेष कुतुहल वाटू लागले होते आणि म्हणूनच हा कार्यक्रम भारतीय प्रेक्षकांसाठीही उपलब्ध करण्यासाठी तो प्रयत्नशील होता आणि आता तर हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस देखील आला आहे. 
भारतातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना अनेक प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वांशी त्याची भेट झाली आहे. ‘100 साडी पॅक्ट’ ही महिलांची एक स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या अंजू कदम यांनी नुकतीच या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांच्याशी भेट झाल्यावर शाहरूखने सांगितले, “नायिकांपेक्षा त्यांच्या साडीच्या पदराशीच मी अधिक रोमान्स केला आहे. मैं हूँ ना या चित्रपटात सुष्मिता सेन ही माझी नायिका होती. या चित्रपटात सुष्मिताने साड्या घातल्या आहेत. त्यात ती इतकी सुंदर दिसत होती की माझ्या चेहऱ्यावरचे सर्व भाव हे खरेच होते, तो अभिनय नव्हता.”

sushmita sen main hoon na

‘स्टार प्लस’वरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाने शाहरूख खान, ‘टेड टॉक्स’ आणि ‘स्टार इंडिया’ या तीन महत्त्वाच्या ब्रॅण्डना एकत्र आणले आहे. याविषयी शाहरुख सांगतो, इंटरनेटद्वारे ‘टेड टॉक्स’ची लोकप्रियता वाढण्यापूर्वीपासूनच मी ‘टेड टॉक्स’चा फार मोठा चाहता होतो. या कार्यक्रमाला मी माझ्या जीवनातील माझी सर्वात मोठी कमाई मानतो, या कार्यक्रमाने मला स्वत:ला व्यक्त होण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मी एक कलाकार आहे, जो भावना व्यक्त करू शकतो, गाणं गाऊ शकतो किंवा नाचू शकतो. मी एक मित्र, वडील, पती, उद्योगपती असलो, तरी ‘टेड टॉक्स’ने मला माझ्यातील व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 

Also Read : ​एकता कपूरने टेड टॉक्स इंडिया नई सोचमध्ये सांगितले तिच्या यशाचे रहस्य

Web Title: Shahrukh Khan is telling, the actress looks very cute in the sari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.