शाहरूख खानला मिळाली अनोखी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 14:57 IST2018-01-02T09:27:21+5:302018-01-02T14:57:21+5:30

स्टार प्लसवरील शो टेड टॉक्स इंडिया नयी सोच हा कल्पनांच्या क्षेत्रातील गेम चेंजर ठरला असून आपल्या आगामी भागाच्या टुमॉरोज्‌ ...

Shahrukh Khan received unique gift | शाहरूख खानला मिळाली अनोखी भेट

शाहरूख खानला मिळाली अनोखी भेट

टार प्लसवरील शो टेड टॉक्स इंडिया नयी सोच हा कल्पनांच्या क्षेत्रातील गेम चेंजर ठरला असून आपल्या आगामी भागाच्या टुमॉरोज्‌ वर्ल्ड ह्या संकल्पनेसह आपले कार्य हा शो निरंतर राखत आहे. या एपिसोडमध्ये गूगल इंकचे प्रथम भारतीय सीईओ सुंदर पिचाई अतिथी वक्ता म्हणून दिसून येतील.

प्रेक्षकांना प्रेरणा देण्यासाठी सुंदर हे बीम रोबोट ह्या डिव्हाईसमधून व्हर्च्युअली उपस्थित असतील. आर्टिफिशियल इंटेलिजंसवर ह्या गूगल सीईओने उत्तम भाषण दिले. किंग खानला ते केवळ आवडलेच नाही तर बीम रोबोटच्या माध्यमातून सुंदर यांची व्हर्च्युअल उपस्थिती पाहून तो थक्क झाला. बीम रोबोट हा एक रिमोट कंट्रोलवर चालणारा डिव्हाईस असून तो अनेक टास्क्स करतो आणि व्हिडीओ चॅटिंगसाठी एखाद्या व्यक्तीच्या व्हर्च्युअल उपस्थितीसाठी वापरला जाऊ शकतो.

चित्रीकरण संपल्यानंतर ह्या शो च्या निर्मात्यांनी तसाच बीम रोबोट एसआरकेला ह्या सीझनचा चेहरा बनून लाखों मनांना प्रेरणा देण्यासाठी आभार मानायला भेट म्हणून द्यायचे ठरवले. त्यांच्या ह्या भेटीमुळे एसआरकेला भरून आले आणि तो विनोदाने म्हणाला, “मला नेहमीच असं कोणीतरी हवं होतं जो फक्त माझं ऐकेल आणि उलट उत्तर देणार नाही.” अखेर ह्या किंग ऑफ बॉलिवूडची इच्छा पूर्ण झालेली दिसतेय.

ALSO READ :  टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमामुळे शाहरुख खानचे हे स्वप्न झाले पूर्ण

शाहरूख खानने नव्या वर्षाच्या मुहूर्तावर चाहत्यांसाठी आगामी चित्रपटाचे नाव जाहिर केले आहे. यंदा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे. यात शाहरुख एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. आनंद एल राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.   टिष्ट्वटरवर शाहरूखने ‘झिरो’चा टीजर जारी केला. ‘टिकटें लिए बैठे हैं लोग मेरी जिंदगी की, तमाशा भी पूरा होना चाहिए,’ असे हा टीजर जारी करताना शाहरूखने लिहिले आहे. आनंद एल राय यांच्या या चित्रपटात शाहरूख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या दोघी मुख्य भूमिकेत आहेत. अर्थात टीजरमध्ये या दोघीही नाहीत. 

Web Title: Shahrukh Khan received unique gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.