शहनाज गिल लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, या खानसोबत करणार स्क्रीन शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 05:25 PM2022-04-28T17:25:36+5:302022-04-28T17:26:01+5:30

Shehnaaz Gill: शहनाज गिल बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

Shahnaz Gill to make Bollywood debut soon, share screen with Khan | शहनाज गिल लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, या खानसोबत करणार स्क्रीन शेअर

शहनाज गिल लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, या खानसोबत करणार स्क्रीन शेअर

googlenewsNext

बिग बॉस फेम शहनाज गिल(Shehnaaz Gill)ने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले, परंतु तिची लोकप्रियता एखाद्या मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. शहनाज गिल बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. आता अशी बातमी समोर येत आहे की शहनाज गिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती सलमान खान (Salman Khan)सोबत चित्रपटात झळकणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज गिल सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटात नुकतीच आयुष शर्माची एन्ट्री झाली आहे. त्याच वेळी, पूजा हेगडे या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आहे. त्यामुळे शहनाज गिल सलमान खान सोबत मुख्य भूमिकेत दिसणार नाही. अशा परिस्थितीत आयुष शर्माच्या विरुद्ध शहनाजला कास्ट केले जाण्याची शक्यता आहे. सलमान खान, पूजा हेगडे आणि आयुष शर्मा आधीच या चित्रपटाचा भाग आहेत आणि जर शहनाज गिल या चित्रपटात सामील झाली तर शहनाज चित्रपटात कोणती भूमिका साकारते हे पाहणे मनोरंजक ठरेल.

या वृत्ताची खूप चर्चा झाली पण सध्या तरी याची अधिकृत घोषणा झालेली नाही. नुकतीच शहनाज गिल चर्चेत आली होती जेव्हा ती बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत दिसली होती. जिथे तिचे शाहरुख खानला भेटतानाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्याचवेळी सलमान खानही याच पार्टीत पोहोचला होता, त्यामुळे शहनाजने सलमानचीदेखील भेट घेतली.


शहनाज गिल अनेक वर्षांपासून पंजाबी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. पण तिला खरी ओळख बिग बॉस १३ मधून मिळाली ज्यामध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभाही झाली होती. या शोमधून तिला खूप लोकप्रियता मिळाली होती.

Web Title: Shahnaz Gill to make Bollywood debut soon, share screen with Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.