‘यह रिश्ता क्या कहलता है’मालिकेत शाहीर शेखची एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 12:58 IST2019-02-18T12:48:44+5:302019-02-18T12:58:02+5:30

‘यह रिश्ता क्या कहलता है!’ या मालिकेत आता अभिनेता शाहीर शेखची एंट्री होणार आहे. या भूमिकेसाठी योग्य असल्याची खात्री पटल्याने निर्मात्यांनी त्याची निवड निश्चित केली आहे.

Shaheer Sheikh to play the male lead in Yeh Rishta Kya Kehlata Hai spin-off | ‘यह रिश्ता क्या कहलता है’मालिकेत शाहीर शेखची एंट्री!

‘यह रिश्ता क्या कहलता है’मालिकेत शाहीर शेखची एंट्री!

ठळक मुद्देआता तो एका अगदी नव्या भूमिकेत दिसणार आहे

स्टार प्लस’वरील ‘यह रिश्ता क्या कहलता है!’ या मालिकेत आता अभिनेता शाहीर शेखची एंट्री होणार आहे. या भूमिकेसाठी योग्य असल्याची खात्री पटल्याने निर्मात्यांनी त्याची निवड निश्चित केली आहे. आता तो एका अगदी नव्या भूमिकेत दिसणार आहे.

मालिकेचे निर्माते राजन शाही म्हणाले, “‘यह रिश्ता क्या कहलता है!’ या लोकप्रिय मालिकेने अलीकडेच आपल्या प्रसारणाची 10 वर्षं पूर्ण केली. त्यामुळे तिच्या मूळ कथानकातील उपकथानकावर आधारित मालिकेच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आता त्यातील नायकाच्या भूमिकेसाठी आम्ही शाहीर शेखची निवड केली असून त्याने आतापर्यंत साकार केलेल्या सर्व भूमिकांपेक्षा ही भूमिका अगदी वेगळी असेल.”

शाहीर शेखने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निवडीच्या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले, “कोणत्याही मालिकेतील भूमिकेसाठी मी सर्वोत्कृष्ट आहे की नाही, हे मला ठाऊक नाही; पण मी प्रत्येक भूमिकेत माझं सर्वस्व ओततो.” आता ‘स्टार प्लस’वरील ‘यह रिश्ता क्या कहलता है!’ या मालिकेच्या उपकथानकावरील आधारित या आगामी मालिकेच्या प्रसारणाची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकतेने प्रतीक्षा केली जात आहे. निर्माते राजन शाही आणि नायकाच्या भूमिकेतील शाहीर शेख ही जोडी प्रेक्षकांसाठी एक नक्कीच प्रेक्षणीय मालिका तयार करील.

Web Title: Shaheer Sheikh to play the male lead in Yeh Rishta Kya Kehlata Hai spin-off