​पंखुरी अवस्थीला काम करायचेय शाहरुख खानसोबत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 15:04 IST2017-04-06T09:34:05+5:302017-04-06T15:04:05+5:30

फातमागुल हा टर्किश शो प्रचंड प्रसिद्ध होता. जगभर या कार्यक्रमाचे चाहते आहेत. याच कार्यक्रमावर आधारित क्या कसूर है अमला ...

Shah Rukh Khan wants to work with Pankhury Awasthi | ​पंखुरी अवस्थीला काम करायचेय शाहरुख खानसोबत!

​पंखुरी अवस्थीला काम करायचेय शाहरुख खानसोबत!

तमागुल हा टर्किश शो प्रचंड प्रसिद्ध होता. जगभर या कार्यक्रमाचे चाहते आहेत. याच कार्यक्रमावर आधारित क्या कसूर है अमला का? ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच या मालिकेची प्रचंड चर्चा आहे. या मालिकेत साध्याभोळ्या अमलाचे आयुष्य प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत पंखुरी अवस्थी प्रमुख भूमिकेत असून अनेक दिग्गज कलाकार या मालिकेचा भाग आहेत.
या मालिकेतील पंखुरीने याआधी रझिया सुलतान या मालिकेत काम केले होते. क्या कसूर है अमला का? या मालिकेमुळे तिला चांगला ब्रेक मिळाला आहे. पंखुरीला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली असली तरी मालिकेत काम करण्यासोबतच तिची आणखी एक इच्छा आहे. तिला भविष्यात शाहरुख खानसोबत काम करायचे आहे.
गेल्या काही वर्षांत पंखुरीने तिच्या अभिनयाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमावले आहे. सध्या ती क्या कुसूर है अमला का या मालिकेतील तिच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना प्रभावित करतेय. पंखुरी ही शाहरुखची खूप मोठी चाहती आहे. लहानपणापासून तिचे शाहरुखवर क्रश असल्याचे ती सांगते. त्यामुळे तिला शाहरूख खानसह एखाद्या चित्रपटात झळकायचे आहे. अभिनेत्री म्हणून संधी न मिळाल्यास एखाद्या लहानशा भूमिकेतही काम करायची तिची तयारी आहे. याविषयी पंखुरी सांगते, “अभिनय करणे हे माझे स्वप्न होते. पण त्याहीपेक्षा इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेता असलेल्या शाहरूख खानसह अभिनय करणे हे माझे मोठे स्वप्न होते. कॉलेजच्या दिवसांपासून तो माझा क्रश आहे आणि कधीतरी त्यांच्यासह काम करायला मिळावे ही माझी एकच इच्छा आहे.”

Web Title: Shah Rukh Khan wants to work with Pankhury Awasthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.