सप्टेंबर नव्हे ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 14:03 IST2016-09-02T08:33:17+5:302016-09-02T14:03:17+5:30
जेनिफर विंगेट आणि कुशल टंडन यांच्या बेहद या मालिकेचा पहिला प्रोमो जुलैमध्ये दाखवण्यात आला होता. या मालिकेद्वारे जेनिफर आणि ...
.jpg)
सप्टेंबर नव्हे ऑक्टोबर
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">जेनिफर विंगेट आणि कुशल टंडन यांच्या बेहद या मालिकेचा पहिला प्रोमो जुलैमध्ये दाखवण्यात आला होता. या मालिकेद्वारे जेनिफर आणि कुशल कित्येक महिन्यानंतर छोट्या पडद्यावर परतत असल्याने प्रेक्षकांना या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता आहे. जेनिफर या मालिकेत पहिल्यांदाच प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. ती या मालिकेत एक नकारात्मक भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जातेय. ही मालिका 12 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होती. पण आता ही मालिका ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. याविषयी कुशलने ट्वीट केले आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "बेहद 12 सप्टेंबरपासून सुरू होत नाहीये तर ही मालिका ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिका सुरू व्हायला जो उशीर होतोय, त्यासाठी मी माफी मागतो."