‘सेल्फी’ची विदेश भरारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 21:21 IST2016-06-02T15:51:39+5:302016-06-02T21:21:39+5:30
‘सेल्फी’ हे ५ अभिनेत्रींच्या नाटकाला महाराष्ट्रात खूपच प्रतिसाद मिळतोय. आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल तर झालेच ...
.jpg)
‘सेल्फी’ची विदेश भरारी
‘ ेल्फी’ हे ५ अभिनेत्रींच्या नाटकाला महाराष्ट्रात खूपच प्रतिसाद मिळतोय. आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल तर झालेच परंतु आता हे नाटक प्रयोगासाठी विदेश भरारी घेत आहे.
असीम एंटरटेनमेंट निर्मित ‘स्वत: कडे वळून बघताना... सेल्फी’ या नाटकाचे सादरकर्ते अजित भुरे आणि हेमंत टकले हे आहेत. नाटकाचे लिखाण शिल्पा नवलकर यांनी केले असून दिग्दर्शन अजित भुरे यांनी केले आहे. या नाटकाचे ८ प्रयोग अमेरिकेमधील वेगवेगळ्या ठिकाणी ५ जून ते २६ जून दरम्यान होणार आहेत.
सुकन्या कुलकर्णी, ऋतुजा देशमुख, पूर्वा गोखले, शिल्पा नवलकर आणि सोनाली पंडीत या ५ अभिनेत्रींची प्रमुख भूमिका असलेलं 'सेल्फी' हे नाटक अमेरिकेतील मराठी मंडळींना अनुभवयाला मिळणार आहेत. ही मंडळी सेल्फीच्या टीमसोबत सेल्फी काढण्यासाठी हमखास तयार असतील.