सिरियल देखना मना है
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 12:24 IST2016-07-05T06:54:39+5:302016-07-05T12:24:39+5:30
इश्कबाज या मालिकेत पहिल्यांदाच अभिनेता महेश ठाकूर एक नकारात्मक भूमिका साकारत आहे. या मालिकेत त्याचे त्याच्या मुलांशी संबंध अतिशय ...
.jpg)
सिरियल देखना मना है
इ ्कबाज या मालिकेत पहिल्यांदाच अभिनेता महेश ठाकूर एक नकारात्मक भूमिका साकारत आहे. या मालिकेत त्याचे त्याच्या मुलांशी संबंध अतिशय तणावपूर्वक असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. तसेच पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे असे मानणारा हा आहे. खऱ्या आयुष्यात महेश हा दोन मुलांचा पिता आहे आणि त्याचे त्याच्या मुलांसोबतचे नाते हे एखाद्या मित्रासारखेच आहे. त्यामुळे त्याच्या मुलांनी ही मालिका पाहू नये असे त्याला वाटते. माझ्या खऱ्या प्रतिमेपेक्षा मी साकारत असलेली तेजसिंह ही भूमिका खूप वेगळी असल्याने माझ्या मुलांनी माझी या मालिकेतील भूमिका पाहू नये अशी माझी इच्छा असल्याचे महेश सांगतो.