SEE PICS: असा पार पडला 'तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणा आणि अंजलीचा विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 13:33 IST2017-03-02T08:02:13+5:302017-03-02T13:33:21+5:30

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजली हे दोघांनीही अवघ्या काही दिवसांतच रसिकांची मनं जिकली आहेत. घराघरांत आज ...

SEE PICS: Rana and Anjali's wedding ceremony in 'Bheja Rangla' | SEE PICS: असा पार पडला 'तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणा आणि अंजलीचा विवाह सोहळा

SEE PICS: असा पार पडला 'तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणा आणि अंजलीचा विवाह सोहळा

ुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजली हे दोघांनीही अवघ्या काही दिवसांतच रसिकांची मनं जिकली आहेत. घराघरांत आज राणा आणि अंजली रसिकांचे आपल्या अभिनायाने तुफान मनोरंजन करतायेत. साधा भोळा असणारा पहिलवान राणा गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजलीच्या प्रेमात पडतो. आणि मग सुरू होते या दोघांचीही प्रेमकथा. या दोघांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.यांच्या प्रेमकथेची सुरुवात,राणाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत,अंजलीला भावलेला त्याचा साधेपणा या सर्व गोष्टींमुळे रसिकही राणा - अंजली 'तुझ्यात जीव रंगला' असे बोलु लागले आहेत. नुकतेच कोल्हापुरमध्ये राणा आणि अंजलीच्या ग्रँड वेडींगचे शूटिंग पार पडले.सध्या या दोघांच्या लग्नाचे प्रोमोही टीव्हीवर झळकू लागले आहेत.त्यामुळे आता रसिकांच्या आवडते राणा आणि अंजलीचे लग्न टीव्हीवर पाहण्यासाठी रसिकही आतुर झाले आहेत.मात्र आता जास्त रसिकांना प्रतिक्षा करण्याची गरज नाहीय.येत्या रविवारी ७ ते ९ या वेळेत हा विवाह विशेष भाग झी मराठीवर रसिकांना पाहता येणार आहे.




राणाने अंजलीकडे आपलं प्रेम व्यक्त केलं आणि लग्नाची मागणी घातल्यानंतर मालिकेतही रोमँटीक ट्रॅक रंगु लागला. मैत्रीपासून सुरु झालेली दोघांची गोष्ट प्रेमापर्यंत कधी आली ते त्यांनाही कळलं नाही आणि आता या प्रेमाला लग्नाचं कोंदण लागणार आहे. राणादा आणि अंजलीबाईंच्या लग्नासाठी सारं गाव मोठ्या संख्येने उपस्थित होतं. प्रत्येक घरात लग्नाचाच विषय असल्यामुळे राणा आणि अंजलीचा लग्नाचा विषयही प्रत्येकाला आपल्या घरातलाच विषय वाटू लागला. या दोघांच्या लग्नामुळे सर्व आनंदी असले तरी नंदितावहिनीच्या मनात मात्र वेगळाच कट शिजतोय. घरात थोरली सून आल्यानंतर आपलं महत्त्व कमी होईल आणि सगळी सूत्रं अंजलीकडे जातील याची भीती तिला वाटतेय आणि याचसाठी ती वेगळी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहे.नंदिता वहिनीचे अशा प्रकारचे डावपेच भोळ्या स्वभावाच्या राणाला कळत नाही आणि त्याच्या याच स्वभावाचा फायदा घेण्याचा डाव नंदिताने आखला आहे. या लग्नामध्ये विघ्न आणण्यासाठी ती कोणती नवी खेळी खेळणार ? यामध्ये ती यशस्वी होईल का ? राणा आणि अंजलीचं लग्न सुरळीत पार पडेल का ? हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.



राणाची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची सधनता, गावात असलेली प्रतिष्ठा हे सगळं मोठं असलं तरी हे लग्न मात्र ते अत्यंत साध्या पद्धतीने पार पडले.घराघरांत आज राणा आणि अंजली रसिकांचे आपल्या अभिनायाने तुफान मनोरंजन करतायेत. त्यामुळे लग्न झाल्यानंतर राणा आणि अंजलीबाई या दोघांची केमिस्ट्री तशीच राहणार का? आयुष्यात येणारे समस्यांचे निवारण हे दोघे कसे करतात हे ही पाहणे रंजक असल्यामुळे ही मालिका रसिकांचे भरघोस मनोरंजन करणार हे माक्त्र नक्की.

Web Title: SEE PICS: Rana and Anjali's wedding ceremony in 'Bheja Rangla'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.