​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतले हे गुपित उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 07:19 AM2018-01-18T07:19:25+5:302018-01-18T12:49:25+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या ...

The secret of Tarak Mehta's reverse chakra series will be unveiled | ​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतले हे गुपित उलगडणार

​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतले हे गुपित उलगडणार

googlenewsNext
रक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेला आज आठ वर्षांहून अधिक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे. 
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षं सुरू असली तरी या मालिकेत अनेक प्रश्न आजही प्रेक्षकांना सतावत आहेत. या मालिकेतील पोपटलालचे लग्न कधी होणार, तसेच पिंकूचे पालक कोण आहेत या प्रश्नांची उत्तरं आजही प्रेक्षकांना मिळालेली नाहीत. पण पिंकूचे पालक कोण आहेत याचा आता शोध टप्पूसेना घेणार आहे. टप्पूसेना एकदा आपले पालक आपली काळजी किती घेतात याविषयी एकमेकांना सांगत असतात. तसेच आपल्या लहानपणाच्या आठवणींविषयी गप्पा मारत असतात. या सगळ्या गप्पांच्या वेळी पिंकू एकदम शांत असतो. एवढेच नव्हे तर तो हा विषय बदलण्याचा प्रयत्न करत असतो. ही सगळी चर्चा सुरू असताना टप्पूसेना ठरवते की आपल्या पालकांना आपण आय लव्ह यू असा मेसेज पाठवूया. त्यांनी मेसेज पाठवल्यावर सगळ्यांना लगेचच त्यांचे पालक रिप्लाय देखील देतात. पण पिंकूच्या मेसेजवर त्याचे वडील काहीच रिप्लाय करत नाहीत. त्यावर पिंकूला टप्पूसेनाने विचारले असता वॉशरूमला जायचे आहे असे कारण देत तो लगेचच तिथून निघून जातो. पिंकू खूप वेळ झाला तरी परतला नसल्याने टप्पू त्याला फोन करतो तर त्याचा फोन बंद लागतो. त्यामुळे टप्पूला टेन्शन येतं आणि टप्पू, सोनू, गोगी आणि गोली त्याचा शोध घ्यायचे ठरवतात. तेवढ्यात पिंकू हरवला आहे ही गोष्ट सोनू पिंकूच्या अमेरिकेतील काकांना सांगते. त्यावर त्याचे काका पिंकूच्या घराचा पत्ता टप्पू सेनाला देतात. टप्पू सेनाला पत्ता मिळाला आहे आणि ते आपल्या घरी जाणार आहे असे पिंकूला कळताच तो गोकुळधाममध्ये येऊन सगळ्यांना घरी जाण्यास मनाई करणार आहे. पण पिंकू असे का करतोय? पिंकूचे पालक कोण आहेत याची उत्तरे प्रेक्षकांना मालिका पाहिल्यानंतरच मिळणार आहेत. 

Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत या महिन्यात परतणार दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी

Web Title: The secret of Tarak Mehta's reverse chakra series will be unveiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.