'पहरेदार पिया की'ला रसिक म्हणतायेत ना-ना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2017 15:07 IST2017-07-24T09:37:32+5:302017-07-24T15:07:32+5:30

'पहरेदार पिया की' ही मालिका 9 वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच ...

Saying 'watchdog piya ki' as auspicious, no-no | 'पहरेदार पिया की'ला रसिक म्हणतायेत ना-ना

'पहरेदार पिया की'ला रसिक म्हणतायेत ना-ना

'
;पहरेदार पिया की' ही मालिका 9 वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांच्या असामान्य विवाहाची कहाणी आहे. दिया आपल्या स्वतःच्या स्वप्नांचे बलिदान देऊन रतनच्या रक्षणार्थ त्याच्याशी विवाह करते अशी या मालिकेची कथा आहे.नुकतीच सुरू झालेली मालिका रसिकांच्या पचनी पडत नसल्याचे पाहायला मिळतंय.ही एक प्रेमकहानी कशी असू शकते? उगाच 'सब कुछ बिगता है'च्या नादात सुरू करण्यात आलेल्या या मालिकेला रसिकांची पसंती कमी रागालाचा सामना करावा लागतोय.ही मालिका लवकरच बंद करण्यात यावी अशी मागणी रसिक करताना दिसतायेत.फक्त रसिकच नाहीतर टीव्ही कलाकारही मालिकेच्या कथानकावर संताप व्यक्त करताना दिसतायेत. अभिनेता करण वाहीला कथानक खटकले असून त्याने त्याच्या फेसबुक पेजवर या मालिकेविषयी लिहीले आहे की,टीआरपीच्या कंटेंटच्या नावावर लोकांना अडाणी बनवू नका.रसिक या सगळ्या गोष्टी जाणून असतात.तर सुयश राय या अभिनेत्याने करणला उत्तर देताना म्हटले आहे की,मालिकेला इतक्या लवकर जज करणे चुकीचे आहे.मालिकेच्या आगामी भागात तुम्हाला कळेल नेमके या मालिकेचा उद्देश काय आहे ते. उगाच एकच बाजु समजुन त्यावर आक्षेप करण्यात काहीही अर्थ नसल्याचे त्याने म्हटले आहे.खरतर या मालिकेच्या प्रोमोमध्ये एक लहान मुलगा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीच्या भांगात कुंकू भरताना दिसतो तेव्हापासूनच ही मालिका रसिक स्विकारतील का अशा चर्चा रंगल्या होत्या.मात्र सद्यस्थिती पाहाता ही मालिका रसिकांना कितपत खिळवून ठेववण्यात यशस्वी ठरते हे पाहणे औत्सक्याचे ठरणार आहे.

Web Title: Saying 'watchdog piya ki' as auspicious, no-no

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.