सायली देवधरचा 'भ्रम'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 17:53 IST2016-05-06T12:14:51+5:302016-05-06T17:53:11+5:30
मिसमॅच, ब्लॅकबोर्ड, लग्न पाहावे करून या चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी सायली देवधर या सुंदर अभिनेत्रीचा भ्रम हा ...

सायली देवधरचा 'भ्रम'
म समॅच, ब्लॅकबोर्ड, लग्न पाहावे करून या चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी सायली देवधर या सुंदर अभिनेत्रीचा भ्रम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायली सध्या लेक माझी लाडकी या नविन मालिकेत काम करत असली तरी भ्रम या चित्रपटाची शुटिंग दीड वर्षापूर्वीच झाली होती.पण या चित्रपटाचे काही भाग आता पूर्ण झाले असल्याचे सायलीने लोकमत सीएनएक्सला सांगितले. सायली म्हणाली, भ्रम हा चित्रपट थ्रीलर आहे. यामध्ये मी आणि अरोहा वेलणकर महत्वाची भूमिका बजाविणार आहे. या चित्रपटात रीमा लागू यांच्यासोबत काम करताना एक छान अनुभव मिळाला. तसेच त्यांच्या कडून खूप काही शिकायला मिळाले. सीमा उपाध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी काही दिवसापूर्वी प्रेमाचा जोज्वाळ हा चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच या चित्रपटात विक्रम गोखले व रीमा लागू यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. चला, तर सायलीचा काय भ्रम असेल हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.