लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सावलीच्या लूकने वेधलं सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 18:43 IST2024-12-04T18:42:10+5:302024-12-04T18:43:34+5:30
Sawalyanchi Janu Sawali Serial : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत लग्नानंतर सावलीच पूर्ण विश्वच बदललं आहे. आता भैरवी सोबत तिला तिलोत्तमाचा ही सामना करायचा आहे.

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सावलीच्या लूकने वेधलं सर्वांचे लक्ष
'सावळ्याची जणू सावली' (Sawalyanchi Janu Sawali Serial) मालिकेत लग्नानंतर सावलीच पूर्ण विश्वच बदललं आहे. आता भैरवी सोबत तिला तिलोत्तमाचा ही सामना करायचा आहे. एकीकडे भैरवी आणि तारा चिंतेत आहेत कारण त्यांना गाण्याच्या काही संध्या गमवाव्या लागल्या आहेत. त्याचबरोबर, जगन्नाथकडे त्यांचा व्हिडिओ आहे आणि तो परत कसा मिळवायचा याची त्यांना चिंता लागली आहे. अशा परिस्थितीत, भैरवी सावलीला भेटते आणि तिच्या वचनाची आठवण करून देते.
दरम्यान, सारंग लग्नानंतर पहिल्यांदाच घरातून बाहेर जाणार असतो, पण तिलोत्तमाच्या सल्ल्यानुसार तो थांबतो. ऐश्वर्या त्याला अस्मीची आठवण करून देते, ज्यामुळे त्याच्या मनात सावलीच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका निर्माण होते. सावली पुन्हा सासरी परत आल्यामुळे तिलोत्तमाला राग येतो आणि ती घर सोडून निघून जाते. ऐश्वर्या सावलीला स्वयंपाकघरात ठेवते, घरात असं ठरवलं जातंय की सावलीच्या कुटुंबातील कोणीही लग्नाच्या रिसेप्शनसाठी येणार नाही, ज्यामुळे सावली निराश होते. ऐश्वर्या भैरवीला रिसेप्शनसाठी गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल कळवते. सावलीवर दबाव असूनही, भैरवी ठामपणे सांगते की सावलीला कार्यक्रमात गाणे गावे लागेल.
सावलीचा पारंपरिक लूक घेतो लक्ष वेधून
रिसेप्शनसाठी अमृता सावलीला पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात नटवणार आहे. सावलीचा हा पारंपरिक लूक प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतो. रिसेप्शनमध्ये सावली तिच्या कुटुंबाचा सन्मानाने उल्लेख करते आणि तीव्र आत्मविश्वासाने आपली बाजू मांडते. रिसेप्शनच्या तयारीदरम्यान, ऐश्वर्या सावलीवर कानातले चोरीचा आरोप करते. घरातील सगळ्यांसमोर तिची चौकशी केली जाते. सावली सरळ उत्तर देते, “जर मी चोर नाही हे सिद्ध होणार नसेल, तर मी इथे राहणार नाही.” सावली ऐश्वर्याच्या जाळ्यात अडकेल? रिसेप्शन मध्ये पारंपारिक लूक पाहून सर्व काय म्हणतील? हे पाहावे लागेल.