असं काय घडलं की 'इंडियन आयडॉल १२'च्या मंचावर सवाई भटला कोसळलं रडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 15:39 IST2021-05-04T15:39:10+5:302021-05-04T15:39:58+5:30
इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनमधील स्पर्धक गेल्या काही दिवसांपासून सवाई भट चर्चेत आला आहे.

असं काय घडलं की 'इंडियन आयडॉल १२'च्या मंचावर सवाई भटला कोसळलं रडू
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सवाई भट चर्चेत येत आहे. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. मागील आठवड्यात सवाई भट मंचावर रडू लागला. त्याच्या पालकांना व्हिडीओ कॉलवर पाहून सर्वांसमोर रडू लागला.
इंडियन आयडॉल १२च्या मंचावर मागील आठवड्यात खूप काही घडले. या भागात काही सिंगर्स भावनिक झाले. पवनदीप राजन आपल्या आईशी बोलताना रडू लागला. याच भागात सर्वात लोकप्रिय स्पर्धक सवाई भटदेखील इमोशनल झाला होता. हे सगळं तेव्हा घडले तेव्हा सूत्रसंचालक आदित्य नारायणने सवाईला सांगितले की, मागील आठवड्यात आईची तब्येत बिघडली म्हणून शो सोडायचा होतास तर बघ आता तुझ्याशी कोणाला बोलायचे आहे. त्यानंतर मोठ्या स्क्रीनवर सवाई भटचे आई वडील आले. सवाईचे पालक त्याला म्हणाले की, आम्ही कसेही राहू. फक्त तू जिंकून ये. सवाईची आई म्हणाली की, आम्ही सगळे ठीक आहोत. मी वेळेवर औषधं घेत आहे. तू आमची चिंता करू नको आणि फक्त शोवर लक्ष दे. आपल्या आईच्या तोंडून सगळ्या गोष्टी ऐकून सवाई भट रडू लागला.
सवाईचे वडील म्हणाले की, तू खूप लकी आहे की तुला हा मंच मिळाला. मी दादाजी कामवर जाऊन जगतो आहे. तू फक्त तुझे, कुटुंब आणि भट समाजाचे नाव रोषण कर. त्यानंतर परीक्षक अनू मलिक आणि मनोज मुंतशिरने सवाईला हिंमत दिली.
इंडियन आयडॉल १२च्या सीझनमध्ये आता फक्त ९ स्पर्धक बाकी आहेत. आगामी काळात आणखी काही सिंगर्स बाहेर पडत आहेत. मागील आठवड्यात पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल टॉप २चे स्पर्धक बनले. ते दोघे फिनालेत पोहचल्याचे बोलले जात आहे.