'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीने ४ वर्षांचा अभिनेत्यासोबतचा संसार मोडला अन् केलं दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:01 IST2025-04-22T15:01:22+5:302025-04-22T15:01:46+5:30

लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा पहिला संसार संपुष्टात आला. त्यानंतर तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.

'Savlyanchi Janu Savali' fame actress Manasi Naik ends 4-year marriage with actor and marries again | 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीने ४ वर्षांचा अभिनेत्यासोबतचा संसार मोडला अन् केलं दुसरं लग्न

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीने ४ वर्षांचा अभिनेत्यासोबतचा संसार मोडला अन् केलं दुसरं लग्न

झी मराठी वाहिनीवरील 'सावळ्याची जणू सावली' (Savlyanchi Janu Savali Serial) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. आता मालिकेत सावली आणि सारंग यांच्यातील जवळीक वाढत असताना सावली तिचे सत्य समोर येईल म्हणून सारंगपासून दूर जाताना दिसत आहे. मात्र त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी अमृता वहिनी प्रयत्न करताना दिसते आहे. त्यामुळे अमृता वहिनीच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. ही भूमिका साकारलीय अभिनेत्री मानसी नाईक(Manasi Naik)ने. फार कमी लोकांना माहित असेल की, मानसीने अभिनेता अक्षर कोठारी(Akshar Kothari)सोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र ते विभक्त झाले. त्यानंतर अभिनेत्रीने दुसरे लग्न केलंय.

अक्षर कोठारीसोबत केलं होतं पहिलं लग्न

अभिनेत्री मानसी नाईक मराठी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने लोकप्रिय अभिनेता अक्षर कोठारीसोबत पहिल्यांदा लग्न केले होते. खरेतर मालिकेत काम करत असताना अक्षर मानसीच्या प्रेमात पडला होता. त्यांनतर त्यांनी लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. २०१९ हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेलं अशा भावना अक्षर कोठारीने सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. घटस्फोटानंतर मानसी नाईकने धृवेश कापुरीया सोबत दुसऱ्यांदा संसार थाटला. मात्र अक्षर कोठारी अद्याप सिंगल आहे. 


मानसी नाईकने गणपती बाप्पा मोरया, चाहूल २, शाब्बास सुनबाई! अशा मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. सावळ्याची जणू सावली मालिकेत ती सहाय्यक भूमिकेत दिसत असली तरी तिची ही भूमिका सकारात्मक असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Web Title: 'Savlyanchi Janu Savali' fame actress Manasi Naik ends 4-year marriage with actor and marries again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.