'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत सत्या आणि बलमामाची जिगरी दोस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 19:52 IST2024-03-22T19:52:37+5:302024-03-22T19:52:47+5:30
Constable Manju Serial : 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत भित्री भागुबाई मंजू आणि बिनधास्त, बेधडक सत्या या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहेच, पण त्याचबरोबर फ्रेण्डशिप गोल सेट करणारी मित्रांची जोडी सुद्धा पाहायला मिळणार आहे.

'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत सत्या आणि बलमामाची जिगरी दोस्ती
आयुष्यात माणसांच्या वाटेला सगळ्या नात्यांचा अनुभव येतो, पण एक नातं असं आहे ज्याच्यासोबतचे क्षण सतत अनुभवावेसे वाटतात आणि ते नातं म्हणजे मैत्रीचं नातं. ज्याला नशिबाने खऱ्या मैत्रीची साथ लाभली आहे तो खरा श्रीमंत आणि सुखी. मैत्री म्हटलं की डोळ्यासमोर येतात ‘करण अर्जुन’, ‘राम लखन’, ‘जय वीरु’ या लोकप्रिय मित्रांची जोडी. तशीच आता आणखी एक जोडी प्रेक्षकांच्या मनात आणि घरात स्थान निर्माण करणार आहे आणि ती जोडी आहे ‘सत्या आणि बलमामा’ यांची.
सन मराठी वाहिनीवर १८ मार्चपासून 'कॉन्स्टेबल मंजू' ही नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत भित्री भागुबाई मंजू आणि बिनधास्त, बेधडक सत्या या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहेच, पण त्याचबरोबर फ्रेण्डशिप गोल सेट करणारी मित्राची जोडी सुद्धा पाहायला मिळणार आहे. सत्या आणि बलमामा हे अगदी जिगरी दोस्त, एकमेंकासाठी दुनियेशी दोन हाथ करणारे मित्र प्रत्येक सीनला काय धमाल करतात हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.
सत्याला कोणी काही बोललं की त्यांचा थेट कार्यक्रम करण्यासाठी निघालेला बलमामा म्हणजे सर्वांचा लाडका अभिनेता राहुल मगदुम आणि आपला सत्या उर्फ वैभव कदम यांच्या दोस्तीची दुनियादारी अनुभवयाची असेल तर 'कॉन्स्टेबल मंजू' ही मालिका पाहावी लागेल.