नेत्राच्या पोटी विराेचकाचा अंश, 'सातव्या मुलीची...'वर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "आता मालिका बंद करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 16:21 IST2024-07-09T16:20:30+5:302024-07-09T16:21:31+5:30

अद्वैत आणि नेत्राची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तर रुपालीच्या कट कारस्थानांना नेत्रा चोखपणे उत्तर देत असल्याचं पाहून चाहते ही मालिका आवर्जुन बघत होते. पण, आता मात्र या मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत. 

satvya mulichi satvi mulgi titeeksha tawade aishwarya narkar serial gets troll | नेत्राच्या पोटी विराेचकाचा अंश, 'सातव्या मुलीची...'वर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "आता मालिका बंद करा"

नेत्राच्या पोटी विराेचकाचा अंश, 'सातव्या मुलीची...'वर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "आता मालिका बंद करा"

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. नवीन आणि वेगळा विषय असल्याने या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मालिकेतील अद्वैत आणि नेत्राची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तर रुपालीच्या कट कारस्थानांना नेत्रा चोखपणे उत्तर देत असल्याचं पाहून चाहते ही मालिका आवर्जुन बघत होते. पण, आता मात्र या मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत. 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत नेत्रा गरोदर असल्याचं दाखविण्यात आलं आहे. लवकरच नेत्रा आणि अद्वैतच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. पण, रुपालीच्या कट कारस्थानामुळे नेत्राच्या पोटी विरोचकाचा अंश जन्माला येणार की काय असा प्रश्न पडला आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये नेत्राच्या पोटात दुखत असल्याचं दिसत आहे. हा प्रोमो पाहून मालिकेवर प्रेक्षक चिडले आहेत. 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत दाखविण्यात येत असलेले कथानक प्रेक्षकांना रुचलेलं नाही. या मालिकेला प्रेक्षकांनी ट्रोल केलं आहे. "यामुळे लोकांचा देवावरचा विश्वास कमी होईल म्हणजे असुरी शक्ती जास्त शक्तीशाली आहे आणि दैवी शक्ती कमी असेच होते ना", असं एकाने म्हटलं आहे. "ही मालिका बंद केली तर बरं होईल", "माझी फेव्हरेट मालिका होती आता फालतुगिरी चालूये", "या मालिकेकडून खूप आशा होत्या", "बंद करा सिरीयल" असं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान,  'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. 

Web Title: satvya mulichi satvi mulgi titeeksha tawade aishwarya narkar serial gets troll