'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत रुपालीचा खरा चेहरा नेत्रा सगळ्यांसमोर आणू शकेल का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 18:29 IST2022-11-10T18:22:17+5:302022-11-10T18:29:54+5:30
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. नेत्राला मिळत असलेल्या संकेतानुसार ती रुपालीचा भूतकाळ जाणून घ्यायचं ठरवते.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत रुपालीचा खरा चेहरा नेत्रा सगळ्यांसमोर आणू शकेल का?
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. यात अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) मुख्य भूमिकेत झळतेय. नेत्रा ही गावातील एक सामान्य मुलगी. पण तिला असामान्य देणगी मिळाली असते. या नेत्राला त्रिनयना या देवीने भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलेलं असतं. नेत्रा दिव्यशक्तीच्या आधारे भविष्य पाहू शकते. आता ही मालिका एका रोमांचक वळणावर आहे.
कारण नेत्राला मिळत असलेल्या संकेतानुसार ती रुपालीचा भूतकाळ जाणून घ्यायचं ठरवते. नेत्राला लहानपणीच्या अव्दैतचा कुणीतरी गळा दाबत असल्याचं दिसतं. शेखरमुळे नेत्राला कळतं की लहानपणापासूनच कुणीतरी अव्दैतला मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता रुपाली अव्दैतला हाताशी धरुन नेत्राला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते, पण अव्दैत नेत्राचं कौतुक करतो.
त्यामुळे रुपाली एकदम आश्चर्यचकित होते आणि आपलं खरं रुप सगळ्यांना कळलंय, असं तिला स्वप्न पडतं. ती लगेच आजोबांच्या खोलीत येते. त्यानंतर रुपाली आणि बंटी आजोबांना मारायची नियोजन करू लागतात. परंतु नेत्राला हे सगळं संकेतामध्ये दिसतं आणि नेत्रा आजोबांना वाचवते. या सर्वप्रकारानंतर नेत्रा रुपालीचा खरा चेहरा सर्वांसमोर करू शकेल? हे पाहणे रोमांचक असणार आहे.