'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, वाढदिवशी स्वत:लाच दिलं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 17:05 IST2024-10-06T17:05:08+5:302024-10-06T17:05:32+5:30

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही टीव्हीवरील लोकप्रिय मराठी मालिका आहे. या मालिकेतील अभिनेत्रीने वाढदिवशी कार खरेदी केली आहे.

satvya mulichi satvi mulgi fame actress shweta mehendale buy new car on her birthday watch video | 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, वाढदिवशी स्वत:लाच दिलं गिफ्ट

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, वाढदिवशी स्वत:लाच दिलं गिफ्ट

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही टीव्हीवरील लोकप्रिय मराठी मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. नेत्रा आणि अद्वैतबरोबरच या मालिकेतील इतर पात्रांनाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री श्वेता मेहंदळे इंद्राणी हे पात्र साकारत आहे. श्वेताचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त श्वेताने स्वत:लाच एक खास गिफ्ट दिलं आहे. 

श्वेताने वाढदिवशी आलिशान कार खरेदी केली आहे. श्वेताने निळ्या रंगाची मारुती सुझुकीची गाडी खरेदी केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तिने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत श्वेताने "हे बर्थडे गिफ्ट आहे. वेलकम शुमी...प्रेम आणि पाठिंब्यासाठी सगळ्यांना थँक्यू..." असं कॅप्शन दिलं आहे. श्वेताच्या या व्हिडिओवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्रीचं अभिनंदन करण्याबरोबरच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 


श्वेता हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील भूमिकेने श्वेताला वेगळी ओळख मिळवून दिली. सध्या या मालिकेतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: satvya mulichi satvi mulgi fame actress shweta mehendale buy new car on her birthday watch video