पुन्हा एकदा पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत एंट्री करणार सतीश कौशिक, दुस-यांदा'मे आय कम इन मॅडम' मालिकेत झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 15:13 IST2017-02-20T09:43:04+5:302017-02-20T15:13:04+5:30
‘लाईफ ओके’वरील ‘मे आय कम इन, मॅडम?’ या लोकप्रिय मालिकेत नामवंत अभिनेते-निर्माता- दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेने ...
पुन्हा एकदा पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत एंट्री करणार सतीश कौशिक, दुस-यांदा'मे आय कम इन मॅडम' मालिकेत झळकणार
‘ ाईफ ओके’वरील ‘मे आय कम इन, मॅडम?’ या लोकप्रिय मालिकेत नामवंत अभिनेते-निर्माता- दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेने सर्वांचे खूपच मनोरंजन केले होते. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उदंड पाठिंबा मिळाला होता. इतका की ते मालिकेतून गेल्यावर या मालिकेच्या निर्मात्यांवर कौशिक यांना परत मालिकेत आणावे, अशी मागणी करणार््या पत्रांचा पाऊस पडला. प्रेक्षकांच्या या विनंतीचा मान राखून निर्माते व या वाहिनीने कौशिक यांची व्यक्तिरेखा ‘मे आय कम इन, मॅडम?’ मालिकेत पुन्हा समाविष्ट केली आहे. आता एका महिन्याच्या खंडानंतर ‘चाचाजी’ (सतीश कौशिक) पुन्हा एकदा या मालिकेत परततील. त्यांच्याकडे एकविशिष्ट प्रकारचे सफरचंद असेल ज्यामुळे अनेक विनोदी प्रसंग उदभवतात. या मालिकेत परतण्याच्या निर्णयावर सतीश कौशिक म्हणाले, “टीव्हीवरील मालिकांमध्ये भूमिका करण्यात वेगळीच मजा येते. त्यात माझ्यातील अभिनेत्याच्या अभिनयकौशल्याचा कस लागतो. आता ‘मे आय कम इन, मॅडम?’ मालिकेत परतता येत असल्याचा मला आनंद होत आहे. ही माझी आवडती मालिका आहे. मालिकेतील अन्य अभिनेत्यांबरोबर काम करण्यास मी उत्सुक झालो आहे.
गेल्या भागात सतीश कौशिक यांनी साजनच्या (संदीप आनंद) काकांच्या भूमिकेत ते दिसणार आहेत. ते स्वत: शिकलेले असून त्यांना आपला पुतण्या साजनच्या पत्नीने निदान ‘एमबीए’सारखी उच्च पदवी संपादन केलेली हवी असते. परंतु साजनची पत्नी काश्मिरा ही फारशी शिकलेली नसते. आपले काका जेमतेम तासाभरापुरते आपल्या घरी येणार असल्याचे लक्षात येताच साजन आपली बॉस संजना (नेहा पेंडसे) हिला थोड्य़ा वेळासाठी आपली ‘एमबीए’ पत्नी बनण्याची विनंती करतो आणि पत्नी काश्मिराला घरकाम करणा-या बाईची भूमिका करायला सांगतो अशा प्रकराची भूमिका केली होती.