'# लय आवडतेस तू मला' मालिकेत सरकार सानिकाचा पारंपरिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 20:06 IST2025-03-19T20:05:58+5:302025-03-19T20:06:43+5:30

# Lai Aavdtes Tu Mala Serial : '# लय आवडतेस तू मला' मालिकेत गावात रोजगार निर्माण करून अनेक कुटुंबांना आधार देणाऱ्या सानिकाच्या प्रयत्नांना अखेर सर्वांच्या शुभेच्छा मिळत आहेत.

Sarkar Sanika's traditional look in the series '# Lai Aavdtes Tu Mala' | '# लय आवडतेस तू मला' मालिकेत सरकार सानिकाचा पारंपरिक अंदाज

'# लय आवडतेस तू मला' मालिकेत सरकार सानिकाचा पारंपरिक अंदाज

कलर्स मराठीवरील # लय आवडतेस तू मला मालिकेत (# Lai Aavdtes Tu Mala Serial) गावात रोजगार निर्माण करून अनेक कुटुंबांना आधार देणाऱ्या सानिकाच्या प्रयत्नांना अखेर सर्वांच्या शुभेच्छा मिळत आहेत. तिच्या या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सरकार सानिकाचा पारंपरिक अंदाज यानिमित्ताने मालिकेत दिसणार आहे. 

सत्यनारायण पूजेच्या तयारीला जोरात सुरुवात झाली. संपूर्ण कुटुंब एकत्र आले आणि कमलने सानिकाला सून म्हणून स्वीकारल्यानंतर कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये सई आणि मिनल पुन्हा एकदा कट रचत होते. पूजेच्या वेळीच सईने गुरुजींसमोर सरकार आणि सानिकाच्या विवाहासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यामुळे गुरुजी नाराज होतात आणि पूजा करण्यास विरोध करतात. सरकार सानिका ह्यांची सत्यनारायणाची पूजा पार पडेल कि नाही हा प्रश्न उभा ठाकतो.


गावकऱ्यांनी आप्पांऐवजी सानिकाला दिलेल्या मान-सन्मानामुळे कमल नाराज होती, तर सईने पुन्हा नवे डाव रचायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी सानिकाच्या नेतृत्वाखाली नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे पाहून तिचे कौतुक केले. सानिकाच्या प्रयत्नांमुळे गावाचा विकास होत असल्याचे सर्वांनी मान्य केले. आप्पांनीही सानिकाच्या धडाडीचे कौतुक केले आणि तिच्या या प्रयत्नांना पाठिंबा दिला. गावकरी आणि आप्पांच्या या प्रतिक्रियांमुळे कमल अधिक अस्वस्थ झाली, तिला वाटू लागले की सानिका अप्पांची जागा घेत आहे. मात्र, सानिकाने तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. गावात रोजगार निर्माण करणारी सानिका आणि तिच्या वैवाहिक आयुष्यावर प्रश्न उपस्थित करणारी सई यांच्यातील हा संघर्ष आता कोणते नवे वळण घेणार? सत्यनारायण पूजेच्या साक्षीने सानिकाच्या कर्तृत्वाची कबुली मिळाली असली, तरी सईचा नवा डाव सरकार आणि सानिकाच्या नात्यावर काय परिणाम करणार? हे पाहणे प्रेक्षकांसाठी अत्यंत रंजक ठरणार आहे. 

Web Title: Sarkar Sanika's traditional look in the series '# Lai Aavdtes Tu Mala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.