'सारे काही तिच्यासाठी' फेम निशीनं सांगितलं तिचं ब्युटी सीक्रेट, म्हणाली - "आठवड्यातून एकदा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:40 PM2024-01-02T19:40:02+5:302024-01-02T19:40:12+5:30

Dakshata Joil : 'सारं काही तिच्यासाठी'ची निशिगंधा खोत म्हणजेच दक्षता जोइल हिने आपल्या निरोगी लांबलचक केस आणि स्वच्छ चमकदार त्वचेचे सीक्रेट सांगितले आहे.

'Sare Kahi Tichyasathi' fame Nishi Aka Dakshata Joil shared her beauty secret, said - "Once in a week..." | 'सारे काही तिच्यासाठी' फेम निशीनं सांगितलं तिचं ब्युटी सीक्रेट, म्हणाली - "आठवड्यातून एकदा..."

'सारे काही तिच्यासाठी' फेम निशीनं सांगितलं तिचं ब्युटी सीक्रेट, म्हणाली - "आठवड्यातून एकदा..."

जसजसा हिवाळा ऋतू उलगडत जातो, तसतसे त्वचा आणि केस कोरडे पडत जातात. सेलिब्रिटी असो किंवा साधारण माणूस आपल्या त्वचेची काळजी घरगुती गोष्टींचा वापर करून करणे ह्याला जास्त प्राधान्य दिले जाते. हे घरगुती उपाय जर तुमचा आवडता कलाकार देत असेल, त्याच्या स्वतःच्या स्कीन आणि हेअरकेअर नित्यक्रमातून तर त्याची गोष्टच निराळी आहे. 'सारं काही तिच्यासाठी'(Sare Kahi Tichyasathi)ची निशिगंधा खोत म्हणजेच दक्षता जोइल (Dakshata Joil) हिने आपल्या निरोगी लांबलचक केस आणि स्वच्छ चमकदार त्वचेचे सीक्रेट सांगितले आहे. 

दक्षताने सांगितले की, मी आठवड्याततुन एकदा रात्री पाण्याची वाफ घेते. रात्री ह्यासाठी कारण वाफ घेतली की त्वचेची छिद्रे उघडतात आणि जर तुम्ही तसेच बाहेर गेलात तर त्यामध्ये धूळ जमा होते आणि मग त्वचा खराब व्हायला सुरुवात होते. म्हणून मी रात्री वाफ घेते आणि त्या नंतर गुलाब पाणीने त्वचा साफ करते. जर तुमच्या चेहऱ्यावर पुटकूळं आली असेल तर फक्त त्याच्या भवती कापसामध्ये गुलाबपाणी घेऊन फिरवायचे. त्याने पुटकूळीची उष्णता ही कमी होण्यासाठी मदत होते. हे झाल्यावर मी घरात बनवलेला फेसपॅक लावते. त्या पॅकमध्ये  संत्र्याच्या सालीची पावडर, चंदन पावडर, गावची आंबे हळद, मध, कच्चे दूध आणि दुधाची  मलाई असेल तर, गुलाब किंवा साधे पाणी या सर्व साहित्यांची छान पेस्ट बनवून चेहऱ्याला लावते आणि ती थोडी सुकायला आली आहे असे दिसले की पाणी लावून त्याला वरच्या दिशेने मालिश करते. खालच्या दिशेने जर मालिश केली तर कातडी लूज पडते म्हणून नेहमी मालिश वरच्या दिशेनेच केली पाहिजे. मालिश करून झाले की फेसपॅक पाण्यानी धुते. हिवाळ्यामध्ये जास्त वेळ जर चेहऱ्यावर फेसपॅक ठेवला आणि तो एक्दम सुकून दिला तर त्वचा  कोरडी पडते. फेसपॅक धुवून  झाल्यावर मी गुलाबपाणी लावते. काही जण तूप ही लावतात. जर या क्रियानंतर मला अचानक बाहेर पडायचं असेल किंवा आऊटडोर शूटिंग असेल तर मी वॉटरबेस्ड सनस्क्रीन लावते जर वॉटरबेस्ड सनस्क्रीन नसेल तर चेहरा सफेद पडतो.

अशी घ्या केसांची काळजी
ती पुढे म्हणाली की, मला घरगुती गोष्टी जास्त आवडतात माझ्या त्वचा आणि केसांच्या छान तब्बेतीसाठी. केसांसाठी मी एक तेल घरी बनवते. मी कोकणातली आहे तर तिथून शुद्ध घाणेवरच नारळाचं तेल आम्ही आणतो,  त्या तेलात जास्वंदीची फुलं, मेथी दाणे , कांदा असेल तर उत्तम किंवा कडीपत्ता हे सगळं त्या तेलात  टाकून त्याला उकळतो. कडीपत्त्याची पाने थोडी काळपट अशी झाली की गॅस बंद करून, आणि थंड झाल्यावर  त्याला मी एका बाटलीत ठेवते. माझे हिवाळ्यात पहिले खूप केस गळायचे पण जेव्हा पासून हे तेल वापरतेय तेव्हापासून मला फरक जाणवतो आहे. तेल लावताना टाळूवर बोटानी मालिश करते आणि मग मोट्या दातांच्या फणीने केस विंचरून त्याची वेणी घालून ठेवते. म्हणजे धुताना जटा होत नाही. स्वतःच्या त्वचा आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी मी या सर्व गोष्टी करते. तुम्ही जर या गोष्टींचा वापर करणार असाल तर आधी एका छोट्या भागावर चाचणी करून घ्या. स्वतःच्या त्वचे वर कारण सर्वांची त्वचा वेगळी असते जर तुम्हाला कशाची अॅलर्जी असेल तर तुम्हाला कळेल आणि तसा तुम्ही या घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.

Web Title: 'Sare Kahi Tichyasathi' fame Nishi Aka Dakshata Joil shared her beauty secret, said - "Once in a week..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.