‘सैराट’मुळं कपिलला नवसंजीवनी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 12:03 IST2016-06-29T06:33:59+5:302016-06-29T12:03:59+5:30
सैराटनं मराठी तिकीट खिडकीवरील कलेक्शनचे सर्व रेकार्ड मोडित काढलेत.रसिकांना झिंग झिंग झिंगाट करत याड लावलं. मात्र याच सैराटनं द ...
‘सैराट’मुळं कपिलला नवसंजीवनी !
स राटनं मराठी तिकीट खिडकीवरील कलेक्शनचे सर्व रेकार्ड मोडित काढलेत.रसिकांना झिंग झिंग झिंगाट करत याड लावलं. मात्र याच सैराटनं द ग्रेट कॉमेडियन कपिल शर्मालाही नवसंजीवनी दिलीय.थोडं नवलं वाटलंच असेल.मात्र सैराटमुळं कपिलचा पुन्हा डंका वाजू लागलाय.कारण गेल्या काही आठवड्यांपासून छोट्या पडद्यावरील टीआरपीमध्ये कॉमेडियन कपिलचा 'द कपिल शर्मा शो' काहीसा मागे पडला होता. टीआरपीमध्ये नागिन, ये है मोहब्बते, कुमकुम भाग्य, जोधा अकबर आणि साथ निभाना साथियाँ मालिकांची चलती होती. टॉप पाचमध्येही कपिलच्या शोला स्थान मिळालं नव्हतं. मात्र नुकतंच जाहीर झालेल्या 24 व्या आठवड्याच्या टीआरपीमध्ये कपिलनं पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतलीय.याचं कारण आहे सैराटच्या टीमची कपिलच्या शोमध्ये हजेरी. टीम सैराटची हजेरी असलेला भाग रेकॉर्डब्रेक रसिकांनी पाहिलाय. त्यामुळं टॉप पाचमध्ये नसलेल्या द कपिल शर्मा शोनं थेट अव्वल स्थानी झेप घेतलीय. कपिलच्या शोमध्ये आलेला सैराट हा पहिला मराठी सिनेमा आहे. हाच सिनेमा आणि त्याच्या टीमनं कपिलला गतवैभव मिळवून दिलं असं म्हटलं तर वावगं ठरु नये..