n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">''ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करिन तुझी सेवा'' लवकरच हे सुर तुम्हाला 'सरस्वती' मालिकेत ऐकायला मिळणार आहेत. नवरात्रीच्या या शुभमुहूर्तावर सरस्वतीमध्ये भोंडला रंगला आहे. या भोंडल्यासाठी सरस्वतीने स्वत: खूप तयारी देखील केली आहे, कारण तिचा लग्नानंतरचा हा पहिला भोंडला असणार आहे. सरस्वतीने या भोंडल्यामध्ये पारंपारिक नऊवारी साडी नेसली असून तिने घातलेल्या दागिन्यांमुळे तिच्या सौंदर्यात अजून भर पाडत आहेत असे म्हणायला हरकरत नाही. चिंचपेटी, कानातले, पैंजण हे सगळे दागिने घातलेली सरस्वती खूप सुंदर दिसते आहे. विशेष म्हणजे या भागामध्ये सरस्वती इंग्रजीमध्ये बोलून जमलेल्यांना चकितही करणार आहे. खरेतर ज्या दिवशी भोंडलाचे शूटिंग होणार हे कळल्यावर मालिकेतील सारेच कलाकार भलतचे खुश होते. सा-यांनी आपापल्या परीने तयारी करत भोंडल्याची सेटवरच मजा लुटली. सेटवर भोंडल्याचे शूटिंग करत असताना कलाकारांनी कॅालेजमध्ये साजरा केलेला भोंडला किंवा सोसायटी मध्ये साजरा केलेला भोंडला अशा जुन्या गोष्टींमध्येही रमताना दिसले.