सरस्वती मालिकामध्ये सरु आणि मोठे मालक यांची दुबईची वारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 16:12 IST2017-02-24T10:42:43+5:302017-02-24T16:12:43+5:30

सरस्वती मालिकेमध्ये आजवर सरस्वतीच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या काही वाईट काही चांगल्या. प्रेक्षकांची खास पंसती नेहमीच या मालिकेला मिळत ...

Saraswati serial series and big owner of Dubai! | सरस्वती मालिकामध्ये सरु आणि मोठे मालक यांची दुबईची वारी !

सरस्वती मालिकामध्ये सरु आणि मोठे मालक यांची दुबईची वारी !

स्वती मालिकेमध्ये आजवर सरस्वतीच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या काही वाईट काही चांगल्या. प्रेक्षकांची खास पंसती नेहमीच या मालिकेला मिळत आलेली आहे. सरस्वतीने आजवर अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर दिले, आपल्या माणसांच्या पाठीशी ती नेहेमीच उभी राहिली आहे, मोठे मालक म्हणजेच राघवच्या मनात देखील सरुने अबाधित स्थान निर्माण केले. तिने घरात तिची महत्वपूर्ण जागा निर्माण केली. पण सध्या वाड्यात अनेक गोष्टी घडत आहेत, ज्या सरस्वतीला देखील थोड्या आश्चर्यकारक वाटत आहेत. वाड्यामध्ये अनेक वेगवेगळे चेहरे आले आहेत ते कोण आहेत ? त्यांचा हेतू काय आहे ? सरस्वतीच्या जीवाला धोका तर नाही ना? या मधून सरस्वती कसा मार्ग काढणार ? असे अनेक प्रश्न सरस्वतीच्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणार यात वाद नाही. पण या सगळ्या प्रश्नांचा उलघडा लवकरच प्रेक्षकांसमोर होणार आहे हे नक्की.
 
नुकताच वाड्यामध्ये रखमा आणि राधाची एन्ट्री झाली आहे. त्यांचे हेतू काही बरे नाहीत अशी शंका  सरुच्या मनात आली आहे. हि रखमा आणि राधा नक्की कुठल्या हेतूने वाड्यामध्ये आले आहेत? त्यात सरुच्या जीवाला धोका आहे, सदानंद काळे नावाचा शुटर सरस्वतीला मारण्यासाठी वाड्यामध्ये आला आहे. रखमा चे पात्र उषा नाईक तर राधा ऋतुजा धर्माधिकारी वठवणार आहे. सदानंद काळेची भूमिका मयूर खांडगे निभवणार आहे.
 
या सगळ्या घडामोडी आणि गोंधळामध्ये सरस्वती आणि राघव लवकरच दुबईची वारी करणार आहेत.सरू आणि राघव पहिल्यांदाच एकत्र परदेशात जाणार असून या दोघांसाठी मिळणारा वेळ खूप स्पेशल असणारा आहे. बऱ्याच कालावधीनंतर सरू आणि राघवच्या आयुष्यात हे क्षण आणि आनंद आला आहे.त्यांना इतका वेळ एकत्र मिळणार आहे. पण त्यांची हि दुबई ट्रीप सुखरूप होईल? सरुला मारण्याच्या हेतूमध्ये सदानंदला यश मिळेल ? कि खरोखरच सरस्वतीचा मृत्यू होईल? सरू पहिल्यांदाच परदेशी जाणार आहे ते पण राघव बरोबर ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करते सरु आणि राघवच्या या सुखी संसाराला कोणाची नजर तर लागणार नाही ना? राघव आणि सरू एकमेकांपासून दुरावले तर जाणार नाही ना ? हे सगळ बघण रंजक ठरणार आहे.
 
 

Web Title: Saraswati serial series and big owner of Dubai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.