सरस्वती फेम आस्ताद काळे लिहित आहे एक कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 13:48 IST2017-12-28T08:18:50+5:302017-12-28T13:48:50+5:30
सरस्वती या मालिकेत आस्ताद काळे राघवची भूमिका साकारत असून त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेली ...

सरस्वती फेम आस्ताद काळे लिहित आहे एक कथा
स स्वती या मालिकेत आस्ताद काळे राघवची भूमिका साकारत असून त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेली दोन वर्षं त्याची ही मालिका सुरू असून या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेआधी आस्तादने अग्निहोत्र, पुढचे पाऊल यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच मिशन पॉसिबल या चित्रपटातही तो मुख्य भूमिकेत झळकला होता. आस्तादने आज छोट्या पडद्यावर त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्याच्या राघव या भूमिकेच्या तर प्रेक्षक प्रेमात आहेत. पण आता अभिनयासोबत अस्ताद लेखनाकडे देखील वळला आहे. तो सध्या एक कथा लिहित असून ती कथा पुढील वर्षापर्यंत लिहून पूर्ण करण्याचे त्याने ठरवले आहे. याविषयी आस्तादने नुकतेच सांगितले आहे.
नववर्ष लवकरच येत असल्याने अनेकजण पुढील वर्षी काय करायचे याविषयी संकल्प करत आहेत. आस्तादने देखील पुढील वर्षी काय करायचे याचा संकल्प केला आहे. याविषयी तो सांगतो, २०१७ हे वर्षं माझ्यासाठी खूपच चांगले होते. या वर्षी मुंबईत माझे घर झाले. तसेच सरस्वती मालिकेच्या निमित्ताने मला दुबईला जाण्याची संधी मिळाली. २०१७ प्रमाणे माझे २०१८ साल देखील चांगले जाईल अशी मी आशा करतो. २०१८ मध्ये बरेच संकल्प करायचे मी ठरवले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला माझ्यात आमुलाग्र बदल करायचे आहेत. तसेच २०१८ मध्ये किमान दोन तरी चित्रपट करायचे आहेत. तसेच एका तरी नाटकात मला काम करायचे आहे आणि मी सध्या एक कथा लिहित आहे. ही कथा पुढील वर्षी पूर्ण करायची आहे.
आस्तादनेच तो कथा लिहित असल्याचे सांगितले असले तरी त्याच्या कथेचा विषय काय असणार याविषयी त्याने मौन पाळणेच पसंत केले आहे. आता प्रेक्षकांचा लाडका आस्ताद कोणत्या विषयावर कथा लिहितो आणि ही कथा प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येते याची त्याच्या फॅन्सना नक्कीच उत्सुकता लागली असणार.
Also Read : आस्ताद काळे रेड अफेअर या चित्रपटात दिसणार राजकीय पुढाऱ्याच्या भूमिकेत