​दिल बोले ऑबेरॉयमध्ये होणार सारा खानची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 10:54 IST2017-02-13T05:24:34+5:302017-02-13T10:54:34+5:30

इश्कबाज या मालिकेच्या यशानंतर या मालिकेच्या कथानकालाच पुढे नेणारी दिल बोले ऑबेरॉय ही मालिका सुरू झाली आहे. कोणतीही मालिका ...

Sara Khan's entry to Dil Bole Oberoi | ​दिल बोले ऑबेरॉयमध्ये होणार सारा खानची एंट्री

​दिल बोले ऑबेरॉयमध्ये होणार सारा खानची एंट्री

्कबाज या मालिकेच्या यशानंतर या मालिकेच्या कथानकालाच पुढे नेणारी दिल बोले ऑबेरॉय ही मालिका सुरू झाली आहे. कोणतीही मालिका सुरू असतानाच त्या मालिकेचा सिक्वल सुरू होण्याची ही छोट्या पडद्यावरची पहिलीच वेळ आहे. या मालिकेत नुकतीच राहुल देवची एंट्री झाली आहे. या मालिकेत राहुलच्या पत्नीच्या भूमिकेत प्रेक्षकांना निधी उत्तमला पाहायला मिळणार आहे. निधीने याआधी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत काम केले होते. 
आता या मालिकेत सारा खानची एंट्री होणार असून सारा एक एअर हॉस्टेसची भूमिका साकारणार आहे. सारा सपना बाबुल का... बिदाई या मालिकेमुळे नावारूपाला आली. तसेच तिने कवच...काली शक्तियो से, ससुराल सिमर का यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येदेखील ती झळकली होती. बिग बॉसच्या घरात लग्न करणारी ती पहिली स्पर्धक ठरली होती. तिने तिचा प्रियकर अली मर्चंटसोबत बिग बॉसच्या घरात लग्न केले होते. पण त्या दोघांनी बिग बॉस संपल्यानंतर काहीच दिवसांत घटस्फोट घेतला. अली आणि साराने केवळ पब्लिसिटीसाठी लग्न केले असल्याचे त्यावेळी म्हटले गेले होते. सारा गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी मालिकांमध्ये काम करत असल्याने ती सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण आता दिल बोले ऑबेरॉय या मालिकेत ती काम करणार आहे.
दिल बोले ऑबेरॉय या मालिकेत ती काहीच भागांसाठी झळकणार असली तरी या मालिकेतील तिची भूमिका ही महत्त्वाची आहे. या मालिकेत ती ऑबेरॉय कुटुंबात बदला घेण्यासाठी येणार आहे. या मालिकेच्या लूकमधील तिचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

Web Title: Sara Khan's entry to Dil Bole Oberoi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.