'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता दिसणार 'तुला जपणार आहे' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:14 IST2025-01-18T09:13:27+5:302025-01-18T09:14:42+5:30

Neeraj Goswami : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत नीरजच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता नीरज गोस्वामी लवकरच एका नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Sara Kahi Tichyasathi fame actor will be seen in the series 'Tula Japnar Aahe' | 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता दिसणार 'तुला जपणार आहे' मालिकेत

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता दिसणार 'तुला जपणार आहे' मालिकेत

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत नीरजच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता नीरज गोस्वामी (Neeraj Goswami) लवकरच एका नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचं नाव आहे 'तुला जपणार आहे' (Tula Japnar Aahe). ही मालिका लवकरच झी मराठीवर दाखल होणार आहे. 

तुला जपणार आहे या मालिकेत आई आणि मुलीची कथा असून मुलीच्या रक्षणासाठी आई कुठल्या अग्निदिव्यांना सामोरी जाणार हे पाहायला मिळणार आहे. यात आईची मुख्य भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारणार आहे. तर, खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड झळकणार आहे. तर नीरज गोस्वामी मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय महिमा म्हात्रे, मिलिंद पाठक, निलेश रानडे, शर्वरी लोहकरे, सिद्धीरुपा कर्माकर आणि बालकलाकार अधिकी कसबे ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. 


तुला जपणार आहे मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात पाहायला मिळतंय की, छान हसत खेळत कुटुंब आहे. त्यात 
माया नावाची व्हिलन आहे. अचानक त्यांच्या सुखी कुटुंबाला नजर लागते आणि मुख्य नायिकेचं निधन होते. त्यानंतर माया अथर्वसोबत लग्न करते. पण तिला मुलीबद्दल आपुलकी नसते. तिलाही त्यांच्या संसारातून बाजूला करायचे असते. पण निधनानंतर मुलीच्या संरक्षणासाठी आई देवीकडे प्रार्थना करते. यात ती आपल्या मुलीचे संरक्षण करू शकेल का, तिला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल, हे पाहणे कमालीचे ठरेल.
 

Web Title: Sara Kahi Tichyasathi fame actor will be seen in the series 'Tula Japnar Aahe'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.