बिग बॉसनंतर 'या' स्टेजच्या मंचावर सारा अली खानने केले 'केदारनाथ'चे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 17:07 IST2018-12-03T17:03:41+5:302018-12-03T17:07:07+5:30

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत या जोडीने नुकतीच कलर्सच्या इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 8 च्या सेटवर आले होते. त्यांचा आगामी सिनेमा केदारनाथच्या प्रमोशनसाठी ते आले होते

Sara Ali Khan & Sushant Singh Rajput on the sets of India’s Got talent | बिग बॉसनंतर 'या' स्टेजच्या मंचावर सारा अली खानने केले 'केदारनाथ'चे प्रमोशन

बिग बॉसनंतर 'या' स्टेजच्या मंचावर सारा अली खानने केले 'केदारनाथ'चे प्रमोशन

ठळक मुद्देकेदारनाथ' हा सारा अली खानचा डेब्यू सिनेमा आहे

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत या जोडीने नुकतीच कलर्सच्या इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 8 च्या सेटवर आले होते. त्यांचा आगामी सिनेमा केदारनाथच्या प्रमोशनसाठी ते आले होते. सेट उत्साहाने गजबजून गेला होता आणि त्या दिवशी सह-परीक्षक म्हणून सुशांत आणि साराचे स्वागत करण्यासाठी परीक्षक आनंदित झाले होते.

आठवड्यांमागून आठवडे, इंडियाज गॉट टॅलेंटचे स्पर्धक प्रेक्षकांना जास्तीची मागणी करायला लावत आहेत. त्याच प्रमाणे, हे दोन परीक्षक सुध्दा मंचावर सादर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परफॉर्मेन्स पाहुन मंत्रमुग्ध झाले होते. त्यांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी, जेव्हा त्यांना माइक दिला गेला तेव्हा, सुशांतने लगेच सांगितले, “अशा प्रकारचे सशक्त परफॉर्मन्सेस आणि अशा प्रकारच्या प्रतिभा शाली  व्यक्ती मी याआधी पाहिल्या नाहीत.''

केदारनाथ' हा सारा अली खानचा डेब्यू सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. केवळ लूकच नाही तर 'केदारनाथ'च्या ट्रेलरमधील साराचा अभिनयही शानदार आहे. 'केदारनाथ' या पहिल्याच चित्रपटात साराने एक किसींग सीनही दिला आहे.या चित्रपटात सारा अली खान अभिनेता सुशांत सिंगसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. 'केदारनाथ'च्या ट्रेलरमधील अनेक दृश्ये चित्तथरारक आहेत. काही दृश्ये तर थेट टायटॅनिक ट्रॅजिडीची आठवण करून देतात. सारा अली खान व सुशांत सिंग राजपूतची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर कशी वाटते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.


 

Web Title: Sara Ali Khan & Sushant Singh Rajput on the sets of India’s Got talent