संकट मोचन महाबली हनुमान झळकणार पेशवा बाजीराव या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 12:54 IST2017-02-01T07:24:09+5:302017-02-01T12:54:09+5:30

संजय लीला भन्साळीच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. बाजीराव मस्तानी या हिट चित्रपटानंतर बाजीराव ...

Sankat Mochan Mahabali Hanuman Chhalakane Peshwa Bajirao in this series | संकट मोचन महाबली हनुमान झळकणार पेशवा बाजीराव या मालिकेत

संकट मोचन महाबली हनुमान झळकणार पेशवा बाजीराव या मालिकेत

जय लीला भन्साळीच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. बाजीराव मस्तानी या हिट चित्रपटानंतर बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावर आता एक मालिका बनवली गेली आहे. पेशवा बाजीराव ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेत प्रेक्षकांना बाजीराव पेशव्यांविषयी जाणून घ्यायला मिळणार आहे. या मालिकेत पल्लवी जोशी, अनुजा साठे, मनिष वाधवा, रझा मुराद, रविंद्र मंकणी यांसारखे मातब्बर कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या स्टारकास्टमध्ये आता आणखी एका अभिनेत्याची भर पडणार आहे. संकट मोचन महाबली हनुमान या मालिकेत बालहनुमानाच्या भूमिकेत झळकलेला इशांत भानुशाली आता या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इशानला बालहनुमान या भूमिकेमुळे चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले होते. आता तो प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 
पेशवा बाजीराव या मालिकेत इशांत विशेष या भूमिकेत झळकणार आहे. इतिहासात अनेक ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे बाजीराव यांना स्वराज्याचा अर्थ आणि महत्त्व समजून देण्यात विशेषचा खूप मोठा हात आहे. या भूमिकेसाठी इशांतने चित्रीकरणाला सुरुवात केली असून त्याची लवकरच या मालिकेत एंट्री होणार आहे. 
संकट मोचक महाबली हनुमान या मालिकेने लीप घेतल्यानंतर इशानने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आपल्या लाडक्या इशानने मालिका सोडल्यामुळे प्रेक्षकांना खूप वाईट वाटले होते. त्यानंतर तो काही दिवसांपूर्वी दिल देके देखो या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने बंटी ही भूमिका साकारत होती. तो दिल देके देखो या मालिकेत तुलसी चोप्राचा म्हणजेच नवनीत निशानचा नातू दाखवला गेलो होता.
प्रेक्षकांना त्यांचा लाडका इशान या नव्या भूमिकेत नक्कीच आवडेल अशी पेशवा बाजीराव या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Web Title: Sankat Mochan Mahabali Hanuman Chhalakane Peshwa Bajirao in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.