संकर्षणच्या मुलांनी पाहिला 'महावतार नरसिम्हा', म्हणाला- "त्यांना सिनेमाचं वेड लागलंय, घरी आल्यापासून फक्त..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:01 IST2025-08-19T11:00:56+5:302025-08-19T11:01:35+5:30

संकर्षण कऱ्हाडेच्या चिमुकल्यांनीही 'महावतार नरसिम्हा' सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर मुलं हरीनामाचा जप करत असल्याचं संकर्षणने म्हटलं आहे. 

sankarshan karhade kids watch mahavtar narsimha movie shared post | संकर्षणच्या मुलांनी पाहिला 'महावतार नरसिम्हा', म्हणाला- "त्यांना सिनेमाचं वेड लागलंय, घरी आल्यापासून फक्त..."

संकर्षणच्या मुलांनी पाहिला 'महावतार नरसिम्हा', म्हणाला- "त्यांना सिनेमाचं वेड लागलंय, घरी आल्यापासून फक्त..."

'महावतार नरसिम्हा' या अॅनिमेटेड सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. भक्त प्रल्हादाची असिम भक्ती आणि त्याचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर नरसिम्हाचा अवतार घेऊन अवतरलेल्या विष्णू भगवान यांची कथा 'महावतार नरसिम्हा' सिनेमातून दाखविण्यात आली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही प्रेम मिळत आहे. सर्वत्र या सिनेमाचं कौतुक होत आहे. संकर्षण कऱ्हाडेच्या चिमुकल्यांनीही 'महावतार नरसिम्हा' सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर मुलं हरीनामाचा जप करत असल्याचं संकर्षणने म्हटलं आहे. 

संकर्षणने एक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो, "सुप्रभात…🌸🙏🏻 काल माझ्या पोरांनी थिएटरला जाऊन “महावतार नरसिंम्हा…” पाहिला. वेड लागलंय त्यांना ह्या सिनेमाचं... घरी आल्यापासून “ओम् नमो भगवते वासूदेवाय नमः” चा आरडाओरडा करत जप चालू आहे. त्यांना २ गोष्टी कळाल्या आहेत म्हणे... १ चांगलं वागलं की नरसिम्हा रक्षण करतो आणि दुसरी अलकाल करू नये म्हणे... कारण देव आपल्यापेक्षा हुशार असतो ! (अलकाल म्हणजे “अहंकार…) मी त्यांच्या आईला म्हणालो, “तुला काय आवडलं सिनेमात?” ती म्हणाली. “२ तास पोरं शांत होते हे खूप आवडलं…”. संकर्षणच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 


दरम्यान, 'महावतार नरसिम्हा' सिनेमा २५ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. सन ऑफ सरदार २, धडक २ यांसारख्या बिग बजेट बॉलिवूड सिनेमांना 'महावतार नरसिम्हा'ने मागे टाकलं आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत २१२.७५ कोटींची कमाई केली आहे. 

Web Title: sankarshan karhade kids watch mahavtar narsimha movie shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.