​संजिदा शेखने केले मिनिषा लांबाला रिप्लेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 11:39 IST2016-12-24T11:10:53+5:302016-12-24T11:39:42+5:30

निर्माता सिद्धार्थ मल्होत्रा हे पूर्वी सिनेविस्ताज या प्रोडक्शन हाऊसचे एक भाग होते. पण त्यांनी आता नुकतेच स्वतःचे वेगळे प्रोडक्शन ...

Sanjida Shaikh did the replica minisha lambaala | ​संजिदा शेखने केले मिनिषा लांबाला रिप्लेस

​संजिदा शेखने केले मिनिषा लांबाला रिप्लेस

र्माता सिद्धार्थ मल्होत्रा हे पूर्वी सिनेविस्ताज या प्रोडक्शन हाऊसचे एक भाग होते. पण त्यांनी आता नुकतेच स्वतःचे वेगळे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या पहिल्या मालिकेत मिनिषा लांबा प्रतीका राव, करण वाही आणि किथ सिक्युरा महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. या मालिकेवर गेल्या कित्येक महिन्यांपासून काम सुरू आहे. पण आता मिनिषा लांबा ही मालिका करत नसल्याचे म्हटले जात आहे. 
मिनिषाने हनिमून ट्रव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिनिषा छोट्या पडद्यावरील बिग बॉसमध्येही झळकली होती. पण हा एक रिअॅलिटी शो होता. तिने कधीच कोणत्या मालिकेत काम केलेले नाही. पण ती सिद्धार्थ यांच्या या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर आगमन करणार असल्याचे म्हटले जात होते. पण काही कारणास्तव आता ती या मालिकेचा भाग असणार नाही. मिनिषा आता ही मालिका करत नसून तिची जागा संजिदा शेखने घेतली आहे. संजिदा आणि निर्मात्यांची या मालिकेविषयी बोलणी झालेली आहेत आणि संजिदाने या मालिकेसाठी होकारदेखील दिलेला आहे. काहीच दिवसांत ती करारावर सहीदेखील करेल असे म्हटले जात आहे. या मालिकेत संजिदाची जोडी किथ सिक्युरासोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या या नव्या मालिकेत संजिदा शेख आणि किथ ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मिनिषा काही वर्षांपासून बॉलिवूड चित्रपटांपासूनही दूर आहे. ती सध्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम करत आहे.  

Sanjeeda Shaikh replaces Minissha Lamba
 

Web Title: Sanjida Shaikh did the replica minisha lambaala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.