​प्रतीका राव, मिनिषा लांबा, आमना शरीफ यांचा पत्ता कट करत संजीदा शेखने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 17:03 IST2017-04-07T11:33:16+5:302017-04-07T17:03:16+5:30

एखाद्या भूमिकेसाठी ऑडिशनला गेल्यानंतर दुसऱ्याच भूमिकेसाठी कलाकाराची निवड झाल्याचे आपल्याला अनेकवेळा ऐकायला मिळते. अनेकवेळा कलाकाराला पहिलीच भूमिका अधिक आवडलेली ...

Sanjida Shaikh did not know the names of Prakka Rao, Minissha Lamba, Amna Sharif | ​प्रतीका राव, मिनिषा लांबा, आमना शरीफ यांचा पत्ता कट करत संजीदा शेखने मारली बाजी

​प्रतीका राव, मिनिषा लांबा, आमना शरीफ यांचा पत्ता कट करत संजीदा शेखने मारली बाजी

ाद्या भूमिकेसाठी ऑडिशनला गेल्यानंतर दुसऱ्याच भूमिकेसाठी कलाकाराची निवड झाल्याचे आपल्याला अनेकवेळा ऐकायला मिळते. अनेकवेळा कलाकाराला पहिलीच भूमिका अधिक आवडलेली असते. पण त्या भूमिकेसाठी तो कलाकार योग्य नसल्याचे प्रोडक्शन हाऊसला वाटल्यामुळे अनेकवेळा त्यांची निराशा होता. असेच काहीसे प्रतीका रावच्या बाबतीत घडले आहे. पण या गोष्टीमुळे ती दुःखी झाली नसून तिला मिळालेली भूमिका ती खूप एन्जॉय करत आहे. अमृता रावची बहीण अशीच काही वर्षांपर्यंत प्रतीकाची ओळख होती. पण आता प्रतीकाने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. बेइन्तहा या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती आणि या भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. आता सिद्धार्थ पी मल्होत्रा यांच्या नव्या मालिकेत प्रतीका एका मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेचे नाव उतरे ना रंग माही असे ठेवणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एका राजघराण्याची कथा पाहायला मिळणार आहे. 
या मालिकेतील एका वेगळ्याच भूमिकेसाठी प्रतीकाने ऑडिशन दिले होते आणि एका वेगळ्याच भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. प्रतीका रावने या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. तिचे ऑडिशन तर खूप छान झाले होते. पण प्रतीका मुख्य भूमिकेपेक्षा दुसऱ्या भूमिकेसाठी योग्य आहे असे प्रोडक्शन टीमला वाटत असल्याने तिची दुसऱ्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आणि मुख्य भूमिका संजीदा शेखला देण्यात आली. या मालिकेत किथ सिक्वेरा प्रमुख भूमिकेत झळकणार असून या मालिकेद्वारे सोनी राजदान अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहेत. 


Web Title: Sanjida Shaikh did not know the names of Prakka Rao, Minissha Lamba, Amna Sharif