'चला हवा येऊ द्या' मंचावर येणार संजय जाधव आणि वैभव तत्ववादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 13:00 IST2019-01-26T13:00:00+5:302019-01-26T13:00:00+5:30

येत्या भागात थुकरटवाडीत दिग्दर्शक संजय जाधव आणि अभिनेता वैभव तत्ववादी येणार आहेत.

Sanjay Jadhav and Vaibhav Tatwawaadi will come in Chala Hawa Yeu Dya | 'चला हवा येऊ द्या' मंचावर येणार संजय जाधव आणि वैभव तत्ववादी

'चला हवा येऊ द्या' मंचावर येणार संजय जाधव आणि वैभव तत्ववादी

ठळक मुद्देसंजय जाधव थुकरटवाडीत येणार म्हणजे विनोदवीर एकच कल्ला करणार

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

येत्या भागात थुकरटवाडीत दिग्दर्शक संजय जाधव आणि अभिनेता वैभव तत्ववादी येणार आहेत. संजय जाधव आणि टीम त्यांच्या आगामी चित्रपट 'लकी' आणि वैभव तत्ववादी व प्रार्थना बेहरे त्यांच्या आगामी चित्रपट 'रेडीमिक्स'च्या निमित्ताने थुकरट वाडीत सज्ज होणार आहे. संजय जाधव थुकरटवाडीत येणार म्हणजे विनोदवीर एकच कल्ला करणार आणि त्यामुळे प्रेक्षक हसून लोटपोट होणार हे नक्की. या कलाकारांच्या उपस्थितीत हास्यसम्राट 'टायटॅनिक' चित्रपटाचे स्पूफ सादर करणार आहेत.  त्यामुळे ही सर्व धमाल  २८ आणि २९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता आपल्या झी मराठीवर!!!

Web Title: Sanjay Jadhav and Vaibhav Tatwawaadi will come in Chala Hawa Yeu Dya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.