कुत्र्याने घेतला चावा, बिघडला अभिनेत्रीचा चेहरा! म्हणाली, आता आयुष्य कधीच पूर्वीसारखे होणार नाही...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 14:30 IST2020-05-17T14:27:21+5:302020-05-17T14:30:10+5:30

करावी लागली प्लास्टिक सर्जरी

sana makbul had face surgery due to dog bite shared reveal on social media-ram | कुत्र्याने घेतला चावा, बिघडला अभिनेत्रीचा चेहरा! म्हणाली, आता आयुष्य कधीच पूर्वीसारखे होणार नाही...!!

कुत्र्याने घेतला चावा, बिघडला अभिनेत्रीचा चेहरा! म्हणाली, आता आयुष्य कधीच पूर्वीसारखे होणार नाही...!!

ठळक मुद्दे2012मध्ये अर्जुन या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक या मालिकांमध्ये काम केले.

टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सना मकबूल सध्या कठीण परिस्थितीचा सामना करतेय. इशान, कितनी मोहब्बत 2, अर्जुन आणि आदत अशा अनेक शोमध्ये झकळलेली सना सध्या छोट्या पडद्यावरून गायब आहे. याचे कारण तिच्यासोबत झालेली एक भयावह दुर्घटना. होय, सनाच्या चेह-याला कुत्र्याने चावा घेतला. यामुळे तिला चेह-याची सर्जरी करावी लागली. 

खुद्द सनाने ही माहिती दिली आहे. सनाने अलीकडे आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहून या घटनेबद्दल सांगितले. या प्रसंगाला विसरण्याचा आणि त्यानंतरच्या मानसिक धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न ती सध्या करतेय.

तिने लिहिले, तुम्हा सर्वांनी दाखवलेल्या काळजीसाठी धन्यवाद. मी गायब झाले नव्हते. मी खूप उशीराने तुमच्याशी बोलतेय, हे मला माहित आहे. पण माझ्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली. एक व्यक्ती म्हणून आणि कलाकार म्हणून मला माझ्या सुंदर चेह-यावर अभिमान होता. प्रेम होते. पण माझ्या या सुंदर चेह-याचेच कुत्र्याने लचके तोडले़. यानंतर मला चेह-याची सर्जरी करावी लागली. ती दु:खद घटना... जी मुलगी प्राण्यांवर प्रेम करायची आज तीच त्यांचा द्वेष करू लागलीय़. आयुष्यभरासाठी माझ्या चेह-यावर वण्र सोडून गेली़. तो प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही़. आता माझे आयुष्य कधीच आधीसारखे होऊ शकत नाही, हा विचार करून मला प्रचंड त्रास होतो. मानसिकदृष्ट्या छळतो. मात्र या कठीण प्रसंगात मी अद्यापही जिद्द सोडलेली नाही़. ना ना पद्धतीने आयुष्य तुम्हाला खूप काही शिकवून जाते़.पण शो मस्ट गो ऑन....

सनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रियादिल्या आहेत. हिंमत सोडू नकोस. तू यातून लवकरच बाहेर पडशील, अशा शब्दांत चाहत्यांनी तिला धीर दिला आहे.

2012मध्ये अर्जुन या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक या मालिकांमध्ये काम केले. शिवाय तिने  रंगून  आणि  मामा ओ चंदामामा  या दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Web Title: sana makbul had face surgery due to dog bite shared reveal on social media-ram