या कारणामुळे समीर पाटील यांनी 'शिवा' मालिकेला ठोकला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:19 IST2025-07-23T15:19:08+5:302025-07-23T15:19:27+5:30
Shiva Serial : 'शिवा' या मालिकेत शिवाच्या सासरे म्हणजेच रामभाऊची भूमिका समीर पाटील यांनी साकारली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी ही मालिका सोडली. दरम्यान आता या मालिकेतून ते बाहेर पडले, त्यामागचं कारण समोर आले आहे.

या कारणामुळे समीर पाटील यांनी 'शिवा' मालिकेला ठोकला रामराम
'शिवा' (Shiva Serial) ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधतीच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील आशू आणि शिवा ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेमध्ये अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा कौशिक यांची मुख्य भूमिका आहे. या मालिकेत शिवाच्या सासरे म्हणजेच रामभाऊची भूमिका समीर पाटील (Sameer Patil) यांनी साकारली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी ही मालिका सोडली. दरम्यान आता या मालिकेतून ते बाहेर पडले, त्यामागचं कारण समोर आले आहे.
काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील शिवा मालिकेतून अभिनेते समीर पाटील यांनी एक्झिट घेतली होती. त्यांनी अचानकपणे मालिका का सोडली? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळालं आहे. समीर पाटील यांना आता हिंदी मालिकेत झळकण्याची संधी मिळाली आहे.
अभिनेते करताहेत या मालिकेत काम
झी मराठीची तुला पाहते रे ही या मालिकेचा रिमेक 'तुमसे तुम तक' ही हिंदी मालिका झी टीव्हीवर प्रसारित होत आहे. शरद केळकर आणि निहारिका चौकसे मुख्य भूमिका साकारत असून नायिकेच्या वडिलांची भूमिका समीर पाटील साकारत आहेत. ही मोठी संधी मिळल्यानेच समीर पाटील यांनी शिवा मालिकेला रामराम केला होता.