n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेता रोनित रॉय याच्या अदालत २ या मालिकेविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या मालिकेचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. दुसऱ्या सिझनमध्येही अभिनेता रोनित रॉय प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच या मालिकेत अभिनेता समीर धर्माधिकारीही झळकणार आहे. समीरने आतापर्यंत अनेक पौराणिक, ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केले आहे. अदालत ही मालिका वेगळ्या साच्यातील असल्याने प्रेक्षकांना एक वेगळा समीर यात पाहायला मिळणार आहे.