Samay Raina: "कोटींचं नुकसान झालं, मी तो व्हिडीओ...", समय रैनाची 'इंडियाज गॉट लेटेंट' वादावर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:15 IST2026-04-08T17:10:36+5:302026-04-08T17:15:10+5:30

Samay Raina On India's Got Latent Show Controversy: समय रैनाला कशाकशाला सामोरं जावं लागलं? केला खुलासा

samay raina back with new show still alive after india s got talent conflict now reacts on it | Samay Raina: "कोटींचं नुकसान झालं, मी तो व्हिडीओ...", समय रैनाची 'इंडियाज गॉट लेटेंट' वादावर प्रतिक्रिया

Samay Raina: "कोटींचं नुकसान झालं, मी तो व्हिडीओ...", समय रैनाची 'इंडियाज गॉट लेटेंट' वादावर प्रतिक्रिया

Samay Raina Still Alive: 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन समय रैनाने (Samay Raina) नव्या शोमधून कमबॅक केलं आहे. 'स्टिल अलाइव्ह' असं त्याने नव्या शोला नाव दिलंय. दरम्यान नुकतंच समय रैनाने इंडियाज गॉट टॅलेंटच्या (India's Got Latent Show) वादावर भाष्य केलं. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने शोमध्ये वादग्रस्त स्टेटमेंट केलं होतं ज्यावरुन मोठा वाद झाला होता. समय रैना, रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता त्यावरुन समय रैना पहिल्यांदाच त्यावर जाहीररित्या बोलला आहे.

'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादाला १ वर्ष झालं आहे. समय रैनाने आता नुकताच एक खुलासा केला. त्या वादानंतर त्याचं ८ कोटींचं नुकसान झालं. तसंच त्याचा या घटनेमुळे सखोल चौकशी आणि कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागलं. 

समय रैना म्हणाला, "कधी कधी मी विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की मी कदाचित तो व्हिडीओ एडिट करायला हवा होता. जानेवारी २०२५ पर्यंत माझं आयुष्य एकदम दमदार सुरु होतं. माझ्या प्रत्येक युट्यूब व्हिडीओवर ५ ते ६ कोटी व्ह्यूज यायचे. प्रत्येक रील, पॉडकास्टवर माझी चर्चा होती. मी सगळ्यांच्या थंबनेलवर असायचो. सेलिब्रिटींना मला भेटायचं असायचं. माझं आयुष्य पाहून इतर कॉमेडियन्सचा जळफळाट व्हायचा. ते माझ्यासारखा कंटेंट बनवण्यासाठी धडपडत होते. खूप मजा येत होती. मी स्वत:ला बादशाह समजायचो. तेव्हा मी अमेरिकेत माझ्या सर्वात मोठ्या शो टूरची घोषणाही केली होती.  याचे ५० हजारपेक्षा जास्त तिकीट विकले गेले होते. मात्र त्या वादामुळे सगळ्यावर पाणी फिरलं. मला एका परफॉर्मन्स आधी बॅकस्टेजला असताना अँग्जायटी अॅटॅकही आला,  तरी मी स्टेजवर जाण्याचा निर्णय घेतला. मला अनेक धमकीपर मेसेजही आले."

Web Title : 'इंडियाज गॉट टैलेंट' विवाद पर समय रैना की प्रतिक्रिया, करोड़ों का नुकसान

Web Summary : कॉमेडियन समय रैना ने 'इंडियाज गॉट टैलेंट' विवाद पर बात की। शो में विवादित बयान के बाद उन्हें कानूनी मुद्दे और आठ करोड़ का नुकसान हुआ। रैना ने वीडियो संपादित न करने पर अफसोस जताया, जिससे उनके करियर पर असर पड़ा और चिंता हुई।

Web Title : Samay Raina Reacts to 'India's Got Talent' Controversy, Loss of Millions

Web Summary : Comedian Samay Raina addresses the 'India's Got Talent' controversy. He reveals facing legal issues and an eight-crore loss after a controversial statement on the show. Raina admits regretting not editing the video, which impacted his career and caused anxiety.