सलमानचा नवा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 13:09 IST2016-09-14T07:39:46+5:302016-09-14T13:09:46+5:30
बिग बॉस या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनच्या प्रोमोमध्ये सलमान खानचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळते. या सिझनच्या प्रोमोसाठी तर ...
.jpg)
सलमानचा नवा अंदाज
ब ग बॉस या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनच्या प्रोमोमध्ये सलमान खानचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळते. या सिझनच्या प्रोमोसाठी तर त्याने अनेक अवतार धारण केले आहेत. बिग बॉस आठच्या वेळी बिग बॉस आठ लगा देगा सबकी वाट हे त्याचे वाक्य खूपच गाजले होते तर बिग बॉस सहामध्ये बिग बॉस छह, अलग छे असे त्याने म्हटले होते. तर प्रत्येक सिझनच्यावेळी कार्यक्रम संपताना डु व्हॉटेव्हर यु वाँट टु डु मॅन असे बोलणारा सलमान तर प्रेक्षकांना खूपच आवडतो. आता बिग बॉस दहाचे नामकरण त्याने बिग बॉस दससस असे केले आहे. एवढेच नव्हे तर त्याने हे दससस बोलताना सापासारखा फुत्कारला सोडला आहे. सलमानची ही स्टाईल प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात काही शंकाच नाही.